रेल्वे स्थानकावर ‘महिलाराज’! इथे काम करतात केवळ महिला कर्मचारी

79

भारतातील विविध राज्यांतून प्रवास करण्यासाठी किंवा गावी जाताना बहुतांश लोक रेल्वेचा वापर करतात. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात एकूण ८ हजार ३३८ रेल्वे स्टेशन आहेत. परंतु भारतात असेही एक स्थानक आहे जिथे केवळ महिला कर्मचारी काम करतात. या अनोख्या रेल्वे स्थानकाचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. या स्थानकाविषयी आपण माहिती जाणून घेऊया…देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत एक असं स्टेशन आहे, जिथे फक्त महिलाच काम करतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या अनोख्या रेल्वे स्थानकाचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकावर सर्व महिला कर्मचारी कार्यरत आहेत. येथे काम करणाऱ्या ४१ महिला कर्मचाऱ्यांपैकी १७ महिला ऑपरेशन्स आणि कमर्शियल विभागात, ६ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, ८ तिकीट तपासणीस, २ उद्घोष, दोन संरक्षण कर्मचारी आणि पाच इतर ठिकाणी अशा महिला कर्मचारी काम करतात. या स्टेशनवरील मॅनेजर सुद्धा महिला आहे.

( हेही वाचा : IBPS Clerk Bharti 2022 : बॅंकेत नोकरी करायची आहे? IBPS अंतर्गत ६०३५ जागांसाठी बंपर भरती! )

जुलै २०१७ मध्ये मध्य रेल्वेने या रेल्वे स्थानकावरील संपूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या स्थानकात केवळ महिला कर्मचारी असल्याने या स्थानकाचे नाव २०१८ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.