वाघ जगला नाही, तर…

216

माणसाने निसर्गावर आक्रमण केल्यामुळे वनसंपत्ती धोक्यात आली आहे. जीवसृष्टीचं पूर्ण चक्रच बिघडलं आहे. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पुन्हा एकदा सुरळीत करण्याचं खूप मोठं आव्हान तरूण पिढी समोर असून, वाघ जगला तरच पर्यावरण टिकेल अन्यथा विनाश अटळ आहे, असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक मुकेश चौधरी यांनी केले. सोनारखेडा येथे रामकृष्ण महाविद्यालय दारापूर यांच्यावतीने आयोजित रासेयो विशेष श्रम संस्कार शिबिरात निसर्ग संरक्षणात युवा पिढीचा सहभाग विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

…तर मानवी जीवन सुसह्य

शिबिराच्या अध्यस्थानी प्रा. गंगाधर पांडे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते, ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते, असे वन्यजीव अभ्यासक मुकेश चौधरी म्हणाले. जंगल उत्कृष्ट असेल, तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते.

( हेही वाचा अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातही नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी! )

वन्यजीव ही नैसर्गिक संपत्ती

पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. एकीकडे शासन वन्य जीवांच्या, धोक्यात असणा-या विविध प्रजातींना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे प्राण्यांच्या विविध अवयव विक्रीसाठी होणारी तस्करी, चोरटी शिकार दुसरी समस्या उभी करीत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वन्यजीव ही एक अनमोल नैसर्गिक संपत्ती आहे. आज विविध संघटना, पर्यावरणप्रेमी संस्था वन्य प्राण्यांच्या संरक्षण, जतन व संवर्धनावर भर देत असल्याचे मुकेश चौधरी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.