मुंबईतील झोपडपट्ट्यांमधून एचआयव्ही रुग्ण गायब!

126

कोविडकाळात मुंबईतून लक्षणीय प्रमाणात स्थलांतर झाल्यानंतर एचआयव्ही रुग्ण शोधण्यात वैद्यकीय यंत्रणेसमोर आता आव्हान उभं राहिलंय. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये विशेषकरुन सुरु असलेल्या एचआयव्ही चाचणीतून रुग्ण गायब असल्याचं सत्य समोर येतंय. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या झोपडपट्ट्यांतील तपासण्यांतून केवळ एक टक्केच रुग्ण एचआयव्हीबाधित असल्यातं समोर येतंय.

तपासण्यातील रिपोर्ट निगेटीव्ह

मुंबईतील झोपडपट्ट्यांतून एचआयव्हीचे रुग्ण शोधण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था गेली काही वर्ष तपासणी शिबिरांचं आयोजन करतेय. यासाठी संस्थेला वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचाही हातभार लागतोय. कोविडकाळात मुंबईतील विविध भागांतील झोपडपट्ट्यांमधील तपासणी शिबीर तसेच जनजागृतीला मर्यादा आल्याचं संस्थेच्या संचालिका डॉ श्रीकला आचार्य सांगतात. कोविडमुळे झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या लक्षणीयरित्या कमी झाली. कित्येकांचे स्थलांतर झालं, कोविडच्या पहिल्या लाटेनंतर परतलेली माणसं पुन्हा दुस-या लाटेच्यावेळीही आपापल्या मूळ गावी परतलीत. हे स्थलांतरित राज्यातील विविध भागांत, परराज्यातील आपापल्या गावी परतले. पुन्हा परतलेले हे संबंधित झोपडपट्टी भागांतच परतलेत, याबाबत आम्हांला साशंकता असल्याची माहिती संस्थेला शिबीरात मदत करणारे स्वयंसेवक सांगतात. त्यामुळे तपासण्यातील रिपोर्ट हा ब-यापैकी निगेटीव्ह येत आहे.

(हेही वाचा – धाकधूक वाढली! अफ्रिकेतून राज्यात आलेले 6 बाधित प्रवासी ‘या’ शहरात?)

याबाबत संस्थेच्या संचालिका डॉ श्रीकला आचार्य यांनीही मूळ रुग्ण शोधण्यात आता पुन्हा नव्या आव्हानाने काम सुरु करावं लागत असल्याचं सांगतिलं. जुलै २०२१ पासून वेगाने झोपडपट्टी भागांतील तपासण्या सुरु आहेत. एकूण तपासण्यांपैकी एक टक्के रुग्णांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे दिसून येत असल्याचं डॉ आचार्य यांनी सांगितलं. ०००

का होत आहेत रुग्ण गायब?

कोविडमुळे रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा राहिलाय. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील मूळ स्थलांतरित मुंबईतच परतलेत का, याबाबत खात्री नाहीय. एचआयव्ही समजायला किमान सहा वर्षही लागतात. आता नव्या कामाच्या शोधात भटकणारे तपासणीसाठी येत असतील, हे सांगता येत नाहीय. परंतु झोपडपट्टी भागांतील एचआयव्हीच्या रुग्णांना शोधणं आव्हान बनलंय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.