मुंबई पर्यटनासाठी निलांबरी ‘बेस्ट’!

128

कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यावर बेस्ट बसच्या ताफ्यात निलांबरी या ओपन डेक बसचे आगमन झाले. मुंबईतील ऐतिहासिक वारसा, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ओपन डेक बस ३ नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली. अगदी महिन्याभरातच निलांबरीने मुंबईकरांना आकर्षित केले. अल्पावधीतच ओपन डेक बसची लोकप्रियता वाढून ही बेस्ट बस पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

ओपन डेक बसला मुंबईकरांची पसंती

दक्षिण मुंबईतील महत्वपूर्ण ठिकाणांना भेट देण्यासाठी, मुंबईतील ऐतिहासिक वारसा संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ओपन डेक बसची निवड केली. ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सुमारे २ हजार ४२७ पर्यटकांनी या बसमधून प्रवास केला आहे. यामुळे बेस्ट प्रशासनाला ३ लाख ६५ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. महिन्याभरातच निलांबरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याचे दर अपर डेकसाठी प्रती व्यक्ती १५० रुपये, तर लोअर डेक ७५ रुपये आहे.

ओपन डेकचा मार्ग

ओपन बसचा मार्ग गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होऊन, प्रिन्स वेल्स ऑफ म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एनसीपीए, मरिन ड्राईव्ह, चौपाटी, चर्चगेट स्टेशन, ओव्हल मैदान, राजाबाई टाॅवर ( मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हाॅर्निमल सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया, ऐशायाटिक लॅयबरी, शेवटचे ठिकाण ओल्ड कस्टम हाऊस आहे.

( हेही वाचा : तुमचं ‘या’ बँकेत खातं आहे? आता पैसे काढण्यावर मर्यादा, RBI चे निर्बंध )

बसच्या वेळा

गेटवे ऑफ इंडियापासून ते ओल्ड कस्टम हाऊस या मार्गावर ओपन डेक बस सायंकाळी ६:३० वाजता, ७:४५ वाजता, ८ वाजता, ९:१५ वाजता या वेळेत प्रवाशांना सेवा देईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.