Oppo Find X8 Ultra : ५० मेगा पिक्सेलचे ३ कॅमेरे असलेला ओपोचा फोन जगभरात लाँच

Oppo Find X8 Ultra : सुरुवातीला हा फोन चीनमध्ये दाखल झाला आहे.

55
Oppo Find X8 Ultra : ५० मेगा पिक्सेलचे ३ कॅमेरे असलेला ओपोचा फोन जगभरात लाँच
  • ऋजुता लुकतुके

ओपो फाईन्ड एक्स८ अल्ट्रा हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे. या फोनमध्ये ५० मेगा पिक्सेल क्षमतेचे चक्क ३ कॅमेरे आहेत. पण, सध्या फोन फक्त चीनमध्येच उपलब्ध आहे. फोनचं वैशिष्ट्य फक्त कॅमेरापुरतं थांबत नाही. तर फोनमध्ये असलेला प्रोसेसर हा स्नॅपड्रॅगन ८ व्या पिढीतील आहे. फोनची रॅम १६ जीबींपर्यंत वाढवता येते. फोनचा डिस्प्ले एमोल्ड २के रिझोल्युशन असलेला आहे. ६.८२ इंचांचा मोठा आहे. (Oppo Find X8 Ultra)

विशेष म्हणजे फोनबरोबर १०० वॅटचा वायर असलेला आणि ५० वॅटचा वायरलेस चार्जर देण्यात येत आहे. फोनची बॅटरी ६,१०० एमएएच क्षमतेची तगडी आहे. तसंच तिला आपी६८ आणि आयपी६९ असं प्रमाणीकरणही मिळालं आहे. ओपो कंपनीचा हा फोन स्वस्तातला नाही. तर प्रिमिअम श्रेणीतील आहे. त्यामुळे १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोन ७६,००० रुपयांना उपलब्ध होईल. तर फोनचं स्टोरेज १ टेराबाईटपर्यंत वाढणार आहे. त्या फोनची किंमतही ९४,००० रुपये इतकी आहे. या फोनमध्ये सॅटलाईट कनेक्टिव्हिटीही असेल. (Oppo Find X8 Ultra)

(हेही वाचा – Deenanath Mangeshkar Charity Hospital : मंगेशकर कुटुंबावर वडेट्टीवारांचा आघात; अजित पवारांचा पलटवार)

फोनमध्यो दोन सिम कार्ड वापरता येतात आणि अँड्रॉईड १५ वर आधारित हा फोन असेल. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ५० मेगा पिक्सेल क्षमतेचे तगडे सोनी फोन. यात टेलिफोटो, पेरिस्कोप लेन्स सोनीच्या आहेत. तर अल्ट्रावाईड लेन्स सॅमसंग जेएन५ ही वापरण्यात आली आहे. हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे आणि फोनमध्ये खास स्क्रीनशॉट बटण देण्यात आलं आहे. या बटनाचा वापर तुम्ही आणखी काही फिचरसाठीही करू शकता. (Oppo Find X8 Ultra)

फोनची तगडी बॅटरी हे फोनचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि वायर असलेल्या चार्जरने २० मिनिटांत फोन ८० टक्के चार्ज होऊ शकतो. असा हा फोन सध्या फक्त चीनमध्येच उपलब्ध होणार आहे. तो जगभरात कधी लाँच होईल हे कंपनीने अजून उघड केलेलं नाही. फोनची स्पर्धा अर्थातच आयफोनशी आहे आणि चीनचं अमेरिकेबरोबर सुरू असलेलं व्यापार युद्ध पाहता चीनने घाई घाईत हा फोन लाँच केला आहे. (Oppo Find X8 Ultra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.