महिला व लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने ‘भव्य ग्राहक पेठ’चे आयोजन करण्यात आले आहे. मीनल मोहाडीकर याच्या आयोजक असून 12 ते 15 जानेवारी या कालावधीत स्काऊट हाॅल, शिवाजी पार्क, दादर येथे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे. या भव्य ग्राहक पेठेचे उद्घाटन डाॅक्टर राजन गुप्ते, डाॅक्टर शिल्पा गुप्ते यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
दरवर्षी मकर संक्रांतीपूर्वी स्काऊट हाॅल येथे ग्राहक पेठेचे प्रदर्शन भरवले जाते. या ग्राहक पेठेत विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. विशेष म्हणजे, पुणे, नाशिक, मुंबई या शहरांतील उद्योजिका या ग्राहक पेठेत सहभाग घेतात. मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी महिला व लघुउद्योजकांच्या उत्पादनांची ग्राहक पेठ भरवली जाते.
( हेही वाचा वर्ल्ड बेस्ट आणि २० वर्ष जुने ‘नोमा रेस्टॉरंट’ बंद होणार? जेवणासाठी वर्षभर आधी करावे लागायचे बुकिंग )
विविध वस्तूंचे प्रदर्शन
या ग्राहक पेठेत खाण्याचे विविध पदार्थ, लहान मुलांचे कपडे, जयपुरी कुर्ता, विविध प्रकारच्या हॅंडमेड साड्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या भव्य ग्राहक पेठेत प्रवेश नि:शुल्क आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या ग्राहक पेठेला भेट देण्याचे आवाहन ग्राहक पेठेच्या संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community