Orra Fine Jewellery : ओरा फाईन ज्वेलरी ब्रँडचे मालक नेमके कोण आहेत?

Orra Fine Jewellery : घरगुती व्यवसायाला व्यापक स्वरुप देत ओरा डायमंड ज्वेलरी ब्रँड पुढे आला आहे. 

34
Orra Fine Jewellery : ओरा फाईन ज्वेलरी ब्रँडचे मालक नेमके कोण आहेत?
  •  ऋजुता लुकतुके

दागिने म्हटलं की सगळ्यांना आठवतं ते सोनं. म्हणजे सोन्याचे असतील तर ते दागिने, अशीच भारतीय माणसाची समजूत इतकी वर्षं होती. नाही म्हणायला गुजराती समाजात हिऱ्याला महत्त्व होतं. सोन्याची मक्तेदारी असलेल्या अशा या भारतीय बाजारपेठेत प्लॅटिनम, व्हाईट गोल्ड यांचे हिरेजडित दागिने आणून ओरा ज्वेलरीने २० वर्षांपूर्वी दमदार प्रवेश केला होता. आणि तेव्हापासून या कंपनीने अगदी दुसऱ्या स्तरावरील शहरांमध्येही लोकांना प्लॅटिनम आणि व्हाईट गोल्डची सवय लावली आहे. (Orra Fine Jewellery)

याचं श्रेय जातं ओरा ज्वेलरीचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जैन यांना. जैन यांचं बालपण नवी दिल्ली आणि दार्जिलिंगमध्ये गेलं. व्यवस्थापकीय शास्त्रात त्यांनी एमबीए केलं ते मुंबईतून. त्यानंतर जागतिक बँकांमध्ये मोठ्या पदांवर नोकरी करण्याची संधी त्यांना मिळाली. १० वर्षं ते त्यात रमलेही होते. पण, व्यवसायाची उर्मी त्यांच्याकडे पहिल्यापासून होती. (Orra Fine Jewellery)

(हेही वाचा – Nepal मध्ये हिंसक निदर्शने ! 105 निदर्शकांना अटक, सीमेवर हाय अलर्ट)

वडिलांचा हिरे व्यापार घरात जुना होता आणि त्यातच विजय जैन यांना एक संधी दिसली. वडिलांचा व्यवसाय मोठा होता. आणि मुंबईत पसरलेला होता. पण, अजूनही तो संघटित नव्हता. एकूणच सोन्याचे दागिने घडवणारेही छोटे छोटे ज्वेलर्स सगळीकडे होते. पण, दक्षिणेतील काही ब्रँड आणि महाराष्ट्रातील लागू बंधू, वामन हरी पेठे असे ब्रँड सोडले तर सोन्याच्या दागिन्यांचेही मोठे ब्रँड नव्हते. ही कमी भरून काढण्याचं विजय जैन यांनी ठरवलं. हिऱ्याचे दागिने विकण्यासाठी एक मोठा ब्रँड बनवला ऑरा. त्यासाठी कंपनीही स्थापन केली ऑरा फाईन ज्वेलरी या नावाने. त्यांची हिरे व्यापारासाठी असलेली कंपनी रोझ ब्लू लिमिटेड या कंपनीचे सर्वाधिक शेअर या कंपनीत होते. (Orra Fine Jewellery)

प्लॅटिनम किंवा व्हाईट गोल्डमध्ये बनलेले हिरेजडित दागिने या ब्रँज अंतर्गत विकले जातात. त्यांची ही कल्पना भारतात सर्वांनी उचलून धरली. देशातील ४० शहरांमध्ये कंपनीची ९५ च्या वर दुकानं किंवा शोरुम आहेत. २०२४ साली कंपनीने १६१० कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. पण, देशात आता नवीन आणि मोठ्या कंपन्यांचे हिरे ब्रँडही येऊ लागले आहेत. टायटन, रिलायन्स या कंपन्याही आता रिटेल हिरे व्यापारात उतरल्यामुळे २०१३ पासून कंपनीचं वर्चस्व थोडं कमी झालं. तेव्हापासून कंपनीने विस्तारासाठी बाहेरून गुंतवणुकीला आमंत्रण दिलं. (Orra Fine Jewellery)

(हेही वाचा – Bajaj Consumer Share Price : बघूया बजाज कन्झ्युमर केअर कंपनीवर संशोधन कंपन्यांचा काय आहे अहवाल)

विजय जैन स्वत: अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि सध्या ते संस्थापक आणि सीईओ आहेत. अलीकडेच ॲडव्हेंट इंटरनॅशनल या अमेरिकन भांडवल कंपनीने ऑरामध्ये गुंतवणुकीसाठी इच्छा प्रदर्शित केल्याची बातमी आली आहे. हा करार पार पडला तर ऑरा कंपनीची मालकी ही ॲडव्हेंट कॅपिटल्स कंपनीकडेच जाईल. त्यांच्याकडे बहुसंख्य मालकी असेल. (Orra Fine Jewellery)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.