यंदा तुम्हीही सिनेमाला मिळवून देऊ शकता ‘ऑस्कर’

149

ऑस्कर हा मनोरंजन क्षेत्रात जगातील सर्वात मानाचा पुरस्कार आहे. चित्रपट सृष्टीत काम करणा-या प्रत्येकाला एकदा तरी ऑस्करची बाहुली मिळवण्याची महत्वाकांक्षा असते. 2022 रोजी संपन्न होणारा 94वा ऑस्कर पुरस्कार सोहळा मात्र खास असणार आहे. यंदा सिनेप्रेमी देखील आपल्या आवडत्या सिनेमाला ऑस्कर मिळवून देऊ शकतात.

यंदा ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात सिनेप्रेमी थेट मतदान करू शकणार आहेत. ‘फॅन फेव्हरेट’असे या नव्या पुरस्काराचे नाव आहे. द अॅकाडमी कडून ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

कसे करू शकणार मतदान?

ट्विटरच्या माध्यमातून सिनेप्रेमींना आपल्या आवडत्या सिनेमाला ऑस्कर मिळवून देता येणार आहे. 27 मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. 94व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नुकतेच नामांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये बेनेडिक्ट कंबरबॅच अभिनीत द पॉवर ऑफ द डॉग या सिनेमाला सर्वाधिक 12 नामांकनं मिळाली आहेत.

‘या’ भारतीय माहितीपटाला नामांकन

आजवर अनेक भारतीय सिनामांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. यंदाच्या वर्षी ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. जय भीम या सिनेमाला ऑस्करचे नामांकन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत टिकू शकला नाही.

या सिनेमांना आहेत नामांकनं

बेलफास्ट (Belfast), कोडा (Coda), डोन्ट लूक अप (Don’t Look Up),ड्युन (Dune), ड्राईव्ह माय कार (Drive My Car), किंग रिचर्ड (King Richard), लिकोरिस पिझ्झा (Licorice Pizza), नाईटमेअर अॅली (Nightmare Alley), द पॉवर ऑफ द डॉग (The Power of The Dog), वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.