Oval Maidan : असा आहे मुंबईतील ओव्हल मैदानाचा इतिहास!

Oval Maidan : ओव्हल आणि आझाद ही मैदानं एकच आहेत का?

29
Oval Maidan : असा आहे मुंबईतील ओव्हल मैदानाचा इतिहास!
  • ऋजुता लुकतुके

मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं ते इथल्या क्रिकेट खेळासाठीच्या सुविधांमुळेच. मैदानं आणि क्लबचं पाठबळ असल्यामुळे इथं क्रिकेटपटू घडले. भारतीय क्रिकेटला दिलीप सरदेसाई, सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजिंक्य रहाणे असे शेकडो गाजलेले क्रिकेटपटू मुंबईने दिले. अशा या मुंबईनगरीतील एक प्रसिद्ध मैदान आहे ते ओव्हल मैदान. या मैदानाची जागाही अशी की, चर्चगेट स्टेशन, इरॉस थिएटर, मुंबई विद्यापीठ यांच्या मधोमध हे २२ एकरांचं मैदान आहे. चर्चगेट स्टेशनच्या दक्षिणेला हे मैदान वसलेलं आहे. (Oval Maidan)

इथं प्रामुख्याने क्रिकेट आणि फुटबॉल हे खेळ खेळले जातात. त्यांची विविध प्रशिक्षण शिबिरं तसंच शालेय स्पर्धाही इथं भरवल्या जातात. विशेष म्हणजे या मैदानावर कुठलीही राजकीय रॅली किंवा आंदोलनं भरवली जाऊ शकत नाही. खेळांसाठी राखीव असं हे मैदान आहे. त्याचा इतर कामांसाठी झालेला वापर हा कायद्याने गुन्हा आहे. राज्य सरकारने तशी तरतूदच केली आहे. मुंबईचा सध्याचा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याच मैदानावर तयार झाला आहे. (Oval Maidan)

(हेही वाचा – औरंगजेबाच्या कबरीच्या वादात Dhirendra Krishna Shastri यांचे विधान; म्हणाले, औरंगजेबाने देश…)

ओव्हल मैदानाशेजारीत आझाद मैदान, कुपरेज मैदान आणि क्रॉस मैदान अशी एकूण चार मैदानं आहेत. २० व्या शतकापर्यंत दक्षिण मुंबईतील ही मैदानं मुंबईची शान होती. त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन हे १९९७ पर्यंत राज्य सरकारकडून केलं जात होतं. पण, देखभालीचं काम नियमितपणे होत नव्हतं. ओव्हल मैदानावर तर भिकारी, अंमली पदार्थांचा व्यापार करणारे भटके विक्रेते आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा वेढा पडला होता. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाशांनी पुढाकार घेऊन ओव्हल – कुपरेज रेसिडेंट्स असोसिएशन या नावाने एक विश्वस्त निधी स्थापन केला. या मैदानांची देखभाल हातात घेतली. काही वर्षं दिलीप वेंगसरकर यांची एल्फ क्रिकेट अकादमी या मैदानात चालत होती. (Oval Maidan)

आताही पावसाळा सोडला तर इतर ८ महिने इथं क्रिकेट आणि फुटबॉलचे प्रशिक्षण वर्ग भरतात. ओव्हल मैदानाला त्याच्या आकारावरून हे नाव पडलं आहे. पण, लोक अनेकदा आझाद मैदानाशी त्याची गल्लत करतात. आझाद आणि ओव्हल ही दोन वेगळी मैदानं आहेत. आझाद मैदान हे बाँबे जिमखाना मैदान म्हणूनही ओळखलं जातं. कारण, १८८५ मध्ये मैदानाच्या एका कोपऱ्यात बाँबे जिमखान्याची सुरुवात झाली होती. आझाद मैदानावर राजकीय मेळावे, आंदोलनं घेता येतात आणि त्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. आझाद मैदान हे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या रेल्वे स्थानकाला जवळ आहे. (Oval Maidan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.