आजही 5 रुपयांत कसा मिळतो Parle-G चा पुडा? अशी आहे Genius स्ट्रॅटेजी

‘Parle-G,,, G माने Genius…’, अगदी लहानपणापासून पार्ले-जी या बिस्कीटासोबत प्रत्येकाचं वेगळं असं एक नातं आहे. जर खिशात अगदी थोडेच पैसे असतील आणि पोटात मोठी भूक असेल तर पार्ले-जी चा छोटासा पुडा आपल्याला नक्कीच आधार देतो. चहाच्या कपात विरघळलेलं पार्ले-जी बोटांनी काढून खाण्यात एक वेगळीच मज्जा आहे. जे स्वस्तात देतं जास्तीत जास्त एनर्जी तेच आपलं पार्ले-जी..

चवीबरोबरच किंमतही कायम

चवीबरोबरच वर्षानुवर्ष पार्ले-जी ची एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे त्याची किंमत. पार्ले-जी च्या छोट्या पुड्याची किंमत 2021 पर्यंत फक्त चार रुपये होती. आता हे बिस्कीट आपल्याला फक्त पाच रुपयांत मिळतं. म्हणजे चहाच्या किंमतीपेक्षाही पार्ले-जी स्वस्त आहे. कितीही महागाई झाली तरी पार्ले-जी कधीही महाग झालेलं नाही. पार्ले-जीला इतक्या स्वस्तात बिस्कीट देणं कसं काय परवडतं? याचंच उत्तर स्विगीचे डिझाईन डायरेक्टर सप्तर्षि प्रकाश LinkedIn वर एक पोस्ट शेअर करत दिलं आहे.

काय आहे आयडिया?

पार्ले-जी ने एक जिनीयस स्ट्रॅटेजी केली आहे. बदलत्या काळानुसार किंमत बदलण्यापेक्षा पार्ले-जीने बिस्कीटाच्या पुड्याची साईज बदलली. सुरुवातीला 100 ग्रॅमचं वजन असलेला हा पुडा नंतर 92.5 ग्रॅ.,88 ग्रॅ. आणि आता 55 ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच आतापर्यंत पार्ले-जी च्या छोट्या पुड्याचं वजन 45 टक्क्यांनी कमी झालं आहे. त्यामुळेच आजही हे बिस्कीट फक्त 5 रुपयांमध्ये देणं पार्ले कंपनीला परवडतं. या टेक्निकला मार्केटिंग भाषेत ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हटलं जातं. वेफर्स,चॉकलेट आणि टूथपेस्ट बनवणा-या कंपन्या अशा स्ट्रॅटेजी वापरत असतात, असंही सप्तर्षि प्रकाश यांनी स्पष्ट केलं आहे. आहे की नाही जी माने जिनीयस आयडिया?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here