पार्वती हिल्स हे पुण्यात असलेलं एक ठिकाण आहे. यालाच पर्वती असेही म्हणतात. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २,१०० फूट म्हणजेच ६४० मीटर एवढ्या उंचीवर आहे. हे पुण्यातल्या अनेक निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. इथे टेकडीच्या वर देवी पार्वतीचं एक मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे पुण्यातला सर्वात जुना वारसा आहे असं मानलं जातं. हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधलं गेलं होतं. (Parvati Hill Temple)
इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्वती हिल्स हे एक निरीक्षण केंद्र देखील आहे. इथून पुण्याचं विहंगम दृश्य दिसतं. वेताळ हिल्स नंतर पार्वती हिल्स हे पुण्यातलं दुसरं सर्वोच्च केंद्र आहे. या टेकडीवर १०८ पायऱ्या आहेत. या पायऱ्या मंदिरापर्यंत जातात. ही टेकडी सुरुवातीला तावरे नावाच्या पाटलांच्या मालकीची होती. त्यानंतर पेशव्यांनी शिवमंदिर बांधण्यासाठी ही टेकडी त्यांच्याकडून खरेदी केली. (Parvati Hill Temple)
इथे असलेलं देवदेवेश्वराचं मुख्य मंदिर काळ्या दगडापासून बनलेलं आहे. हे मंदिर १७४९ साली बालाजी बाजीरावांच्या काळात बांधून पूर्ण झालं. त्यानंतर १७६० साली मंदिरावर सोन्याचा शिखर जोडण्यात आला. याव्यतिरिक्त इथे विठ्ठल आणि रुक्मिणी, श्रीहरी विष्णू आणि कार्तिकेय यांचीही मंदिरं आहेत. (Parvati Hill Temple)
(हेही वाचा – मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवेल, सकाळचा भोंगा नाही; Chandrashekhar Bawankule यांचा राऊतांना टोला)
पार्वती हिल्सवर असलेली मंदिरं
पार्वती हिल्सवर एकूण ५ मंदिरं आहेत…
- देवदेवेश्वर मंदिर (शिव आणि पार्वतीचं)
- कार्तिकेय मंदिर
- विष्णू मंदिर
- विठ्ठल मंदिर
- श्रीराम मंदिर
ही सर्व मंदिरं सकाळी ५:०० वाजता उघडण्यात आणि रात्री १०:०० वाजता बंद करण्यात येतात. (Parvati Hill Temple)
(हेही वाचा – IPL 2025 : ‘बॅट विरुद्ध बॉल द्वंद्वांत गोलंदाजांनाही समान संधी हवी’; शार्दूल ठाकूरने व्यक्त केली अपेक्षा)
पार्वती हिल्सवरच्या इतर रचना
- पार्वती हिल्स इथे मंदिराव्यतिरिक्त पेशव्यांचं एक संग्रहालय आहे. या संग्रहालयात पेशव्यांच्या काळातली शस्त्रं, नाणी, भांडी, लाकडी फर्निचर, वाहतुकीचे साधनं जसं की, पालखी आणि इतर अनेक भेटवस्तू ठेवलेल्या आहेत.
- बालाजी बाजीराव यांची समाधी देखील या ठिकाणी आहे.
- पार्वती हिल्सवर असलेल्या पाण्याच्या टाकीमार्फत पुणे शहराच्या अर्ध्या भागाला पाणीपुरवठा केला जातो.
या हिल्सच्या अर्ध्या वर आग्नेय दिशेला एक जुनी गुहा आहे. ही गुहा पाताळेश्वर लेण्यांशी समकालीन असल्याचं मानलं जातं. (Parvati Hill Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community