Passport Ranking : जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे या देशाचा! भारत कितव्या स्थानी? पहा संपूर्ण यादी…

163

जगभरातील देशांचे पासपोर्ट रॅंकिंग दरवर्षी जारी केले जाते. लंडनस्थित ग्लोबल सिटिजनशिप अँड रेसिडेंस अ‍ॅडव्हायजरी फर्म हेनले अँड पार्टनर्सद्वारे (Henley and Partners) २०२३ मधील पासपोर्ट रॅंकिंगची माहिती देण्यात आली आहे. ग्लोबल पासपोर्टच्या रॅंकिंगमध्ये १०९ देशांच्या पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहे. याची माहिती इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनमार्फत देण्यात आली आहे.

( हेही वाचा : पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने बॅंकेच्या पासबुकमध्ये केला ‘हा’ मोठा बदल)

कोणत्याही देशात प्रवास करताना पासपोर्ट हे महत्त्वाचे ओळखपत्र असते. पासपोर्टमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी मिळते. पासपोर्टशिवाय तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकत नाही, असे करणे बेकायदेशीर आहे. २०२३ मध्ये जारी केलेल्या रॅंकिंगनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया…

हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे

हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा जपान या देशाचा आहे. या यादीत जपाननंतर सिंगापूर आणि दक्षिण कोरिया हे देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत जर्मनी आणि स्पेन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर फिनलंडचे ३ देश, इटली आणि युरोपमधील एक देश, लक्झेंबर्ग आहेत. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलँड आणि स्वीडन पाचव्या क्रमांकावर आहेत.

भारताच्या पासपोर्टची क्रमवारी

ग्लोबल पासपोर्ट रँकिंग २०२३ मध्ये भारताचा क्रमांक ८५ वा आहे. त्याचबरोबर भारताचा शेजारी देश भूतानचा पासपोर्ट ९० व्या क्रमांकावर आहे. चीनच्या पासपोर्टचे रँकिंग ६६ वे आहे. श्रीलंकेचा पासपोर्ट १००व्या तर बांगलादेशचा पासपोर्ट १०१व्या क्रमांकावर आहे. येमेनचा क्रमांक १०५ वा तर म्यानमारचा ९६ व्या स्थानी आहे.

पाकिस्तान शेवटून चौथ्या स्थानी

पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट आहे. याचा परिणाम पाकिस्तानच्या रॅंकिंगवर सुद्धा झाला आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार पाकिस्तान हा १०६ व्या स्थानी आहे. नेपाळचे पासपोर्ट रॅंकिंग पाकिस्तानपेक्षा चांगले असून नेपाळ हा देश १०३ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या खाली सीरिया, इराक आणि सर्वात शेवटी अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचे मानांकन १०९वे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.