नुकताच ४ मे रोजी जागतिक पासवर्ड दिवस पार पडला. याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर NordPass या कंपनीच्या अहवालात २०२२ मध्ये भारतीयांद्वारे सर्वाधिक वापरल्या जाणार्या पासवर्डची यादी समोर आणली गेली होती. या पासवर्ड व्यवस्थापकाच्या अहवालात असे काही फार मोठ्या प्रमाणाच वापरले गेलेल पासवर्ड होते आणि हॅकर्सकडून ते क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ देखील या ठिकाणी दाखवला गेला होता.
दरम्यान नॉर्डपासने त्यांच्या अहवालात दिलेल्या माहितीत असे म्हटले होते की, सायबरसुरक्षा जागरूकता वाढत असूनही, त्याच्या संशोधनात असे दिसून आले आहे की लोक अजूनही त्यांच्या अकाउंटची सिक्यूरिटी म्हणून वापरत असलेले पासवर्ड कमकुवत असतात. तर अशाच १० पासवर्डबद्दल पाहू ज्यांना देशातील लोकांनी सर्वाधिक वेळा वापरलं आहे. तसंच हॅकर्सना ते क्रॅक करण्यासाठी किती वेळ लागेल ते देखील पाहू…
(हेही वाचा Khalistan : पाकिस्तानातच खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडाची हत्या )
password – हा शब्द क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ १ सेंकद
123456 – हा शब्द क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ १ सेंकद
12345678 – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ १ सेंकद
p@ssw0rd – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ २ मिनिटं
123456789 – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ १ सेंकद
Password: pass@123 – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ २ सेंकद
1234567890 – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ १ सेंकद
anmol123 – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ २ मिनिटं
abcd1234 – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ १ सेंकद
987654321 – क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ १ सेंकद
तर वर वापरण्यात आलेल्या या पासवर्डमध्ये पाहिलं तर अगदी सेकंदात हे पासवर्ड हॅकर्स हॅक करतात. यात Password हा शब्द अनेकजण लिहितात. तर अनेकजण या शब्दातील a ला @ करतात. अनेकजण आपल्या नावातील एखाद्या अक्षराला फक्त स्पेशल कॅरेक्टर करतात. पण हे पासवर्डही लगेत हॅक होतात. तसंच 1 ते 8 किंवा 1 ते 9 असे अंक टाकणारे पासवर्डही लगेच ओळखले जातात. काहीजण एखादं नाव किंवा फोन नंबर किंवा काही अल्फाबेटिकल अक्षरं असे पासवर्ड ठेवतात. जे देखील लगेच ओळखले जातात.
Join Our WhatsApp Community