Pateshwar Temple : हजारो शिवलिंगांचं मंदिर म्हणजेच पाटेश्वर मंदिराचं अद्भुत रहस्य आहे तरी काय?

47
Pateshwar Temple : हजारो शिवलिंगांचं मंदिर म्हणजेच पाटेश्वर मंदिराचं अद्भुत रहस्य आहे तरी काय?

पाटेश्वर महादेवाचं सुंदर कलात्मक मंदिर आणि लेणी हे सातारा पासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव नावाच्या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर आहेत. येथे अनेक शिवलिंगे आहेत. त्यांपैकी प्रत्येक शिवलिंग एकेकाळी वेगवेगळ्या आकारात अत्यंत कलात्मक रीतीने कोरलेलं होतं. साताऱ्याच्या जवळ असूनही हे ठिकाण तसं पर्यटकांपासून थोडं वंचितच राहिलं आहे. (Pateshwar Temple)

या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बरेच पक्षी देखील आहेत. याव्यतिरिक्त बामणोली, कास पठार, अजिंक्यतारा किल्ला आणि पाटेश्वर महादेव मंदिर ही ठिकाणं साताऱ्याच्या भोवती असलेली भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत. (Pateshwar Temple)

पाटेश्वर महादेव मंदिराचा इतिहास :

पाटेश्वर महादेव मंदिर हे १८ व्या शतकामध्ये सेनापती अंगल याने बांधलं होतं. पण तरीही इथे असलेल्या लेण्यांचं मूळ आणि तपशीलवार इतिहास अद्याप माहिती नाही. (Pateshwar Temple)

(हेही वाचा – Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका)

पाटेश्वर महादेव मंदिराजवळची काही आकर्षक ठिकाणे : 

पाटेश्वर महादेव मंदिराच्या डोंगरावर चढताना, सुरुवातीलाच गणेशाची एक प्राचीन मूर्ती दिसते. तसंच सुरुवातीलाच एक “विश्वेश्वर” नावाचा छोटा कमळाचा तलाव आहे. या तलावाच्या एका भिंतीवर महादेवांचं दुर्मिळ शिल्प कोरलेलं आहे. या मूर्तीला फक्त एक पाय आहे. पहिल्या लेण्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग या तलावाजवळूनच जातो. इथे असलेल्या पहिल्या गुहेला “मार्गल म्हशी” असं म्हणतात. या ठिकाणी मृत म्हशीच्या पाठीवर शिवलिंगाचं शिल्प कोरलेलं आहे. या शिल्पाचा संबंध महिषासुराच्या वधाच्या कथेशी आहे असं मानलं जातं. इथल्या गुहेमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणखी सहा शिवलिंग आहेत. तसाच इथली आणखी पाच शिवलिंगे निसर्गाच्या पाच घटकांचे म्हणजेच पृथ्वी, पाणी, आकाश, अग्नी, वारा यांचं प्रतिनिधित्व करतात. (Pateshwar Temple)

तलावाजवळ सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून पाटेश्वर महादेव मंदिरात पोहोचता येतं. इथे वाटेत आणखी दोन शिवलिंगे आहेत. एका शिवलिंगावर मध्यभागी एक मुख्य लिंग कोरलेलं आहे आणि त्याच्याभोवती इतर ६८ उपलिंगे कोरलेली आहेत. तर दुसऱ्या शिवलिंगावर दाढी आणि मिशा कोरलेल्या आहेत. त्याच्याभोवती इतर ७१ उपलिंगे कोरलेली आहेत. (Pateshwar Temple)

(हेही वाचा – Tiger Death : वाघांच्या मृत्यूवर आळा घालण्यासाठी वनमंत्र्यांचे कठोर निर्देश)

त्यानंतर पुढे गेल्यावर “बलिभद्र मंदिर गुहा” नावाचा पाच गुहांचा समूह आहे. या ठिकाणी शिवलिंगाच्या शेजारी चक्र, हृदय, वर्तुळ इत्यादी दहा आकार कोरलेले आहेत. त्यापैकी आठ आकार हे अष्टदिशा दर्शवतात. तर इतर दोन आकार हे सूर्य आणि चंद्राचे प्रतिनिधित्व करतात. याव्यतिरिक्त अष्टमातृका, दशावतार, माहेश्वरी, शेषाषयी विष्णू, महिषासुरमर्दिनी, कार्तिकेय, चामुंडा, नवग्रह इत्यादींची अनेक शिल्पे या ठिकाणी आहेत. (Pateshwar Temple)

पाटेश्वर महादेव मंदिरातलं आणखी एक विलक्षण शिल्प म्हणजे “अग्नि-विष्णू” होय. या शिल्पामध्ये सात हात असलेला मनुष्य आणि शस्त्रे असलेल्या बैलाचे संयोग दिसून येतात. हे शिल्प समोरून पाहिलं तर दाढी असलेली आकृती दिसते आणि बाजूच्या कोनातून पाहिलं तर बैल म्हणजेच नंदी दिसतो. (Pateshwar Temple)

(हेही वाचा – Maha Kumbh stampede: प्रयागराज महाकुंभ दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी केली ‘एक्स’ पोस्ट, रेल्वेमंत्र्यांशीही बोलले)

मंदिराच्या पुढच्या व्हरांड्यात तीन गुहांचा समूह आहे. मुख्य गुहेमध्ये पूर्वेकडच्या भिंतीवर देवी पार्वतीची मूर्ती कोरलेली आहे. त्या मूर्तीच्या शेजारी ९७२ शिवलिंगे आहेत. दक्षिणेकडच्या भिंतीवर भगवान विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीच्या शेजारी १००० शिवलिंगे आहेत. तसंच सूर्यदेवांची मूर्ती आणि त्याच्या शेजारी १००० शिवलिंगे आहेत. याव्यतिरिक्त या ठिकाणी भालचंद्र, शिवाजी महाराज, भगवान ब्रह्मा, एक, चार आणि हजारमुखी शिवलिंगे, कालसर्प यांच्याही मूर्ती आहेत. तसंच एक शिलालेख देखील आहे पण तो वाचणे कठीण आहे. (Pateshwar Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.