काय सांगताय! सर्दी झालीये नो टेन्शन! कोरोनापासून होऊ शकतो बचाव…

गेल्या दीड दोन वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वांनाच हैराण केले आहे. घसा दुखण, सर्दी, ताप आणि तोंडाची चव जाणे हे प्रमुख कोरोनाची लक्षणं आहे. मात्र आता साधी सर्दी जरी झाली तर टेन्शन घेऊ नका. कारण सर्वसामान्य सर्दीला प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये निर्माण होणारे टी सेल्स हे कोरोनाच्या विषाणूचा संसर्गचा धोका कमी करतात. म्हणजेच सार्क-सीओव्ही २ चा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असं ब्रिटनमधील एका संशोधनामधून समोर आले आहे. हे संशोधन लंडनमधील इम्पिरियल कॉलेजच्या संशोधकांनी केले असून ‘नेचर कम्युनिकेशन्स’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनामध्ये असा दावा करण्यात आला की, टी सेल्समुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती कोरोनापासून बचाव करू शकते.

टी सेल्समुळे होते कोरोनाचे संरक्षण

कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या टी सेल्समुळे घातक ठरणाऱ्या कोव्हिड-१९ चा संसर्ग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या सीर्स-सीओव्ही-२ या विषाणूला प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण असे यापूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. तर या नव्या संशोधनानुसार, टी सेल्समुळे कशाप्रकारे सार्स-सीओव्ही -२ चा संसर्ग न होता संरक्षण मिळतं हे दिसून आले आहे.

(हेही वाचा – हुश्श! आता लवकरच ओमायक्रॉनवर मात करता येणार, कसं ते वाचा…)

रोगप्रतिकारशक्ती संसर्ग रोखण्यास मदत करते

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना हा विषाणूंचा एक प्रकार असून या विषाणूंपैकी सार्क-सीओव्ही २ प्रकारच्या ठराविक विषाणूचा संसर्ग झाल्यास कोरोनाचा संसर्ग झाला असे म्हटले जाते. तर सामान्य सर्दीसाठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूंमुळे शरीरामध्ये निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती ही कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत करु शकते, असे संशोधकांचं म्हणणं आहे. सामान्य सर्दीसाठी कारणीभूत असणाऱ्या कोरोनामुळे निर्माण होणारे टी सेल्स हे सार्स-सीओव्ही-२ चा संसर्गापासून संरक्षण देतात याचे पुरावे सापडलेत असे लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमधील नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे निर्देशक प्राध्यापक अजित लालवानी यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here