श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांना, शिवाजी महाराज ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) तर्फे देण्यात येणारा पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव २०२१ पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक व सामाजिक कार्यात असलेल्या सक्रिय सहभागाबद्दल सुनील पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती ज्ञानपीठाचे संस्थापक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी दिली.
पुरस्काराचे स्वरुप
मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारासोबत मिळणाऱ्या ५ हजार रुपयांतून इतिहासाची पुस्तके गावोगावी असणाऱ्या शाळांमध्ये सुनील पवार यांच्या समितीमार्फत वाटण्यात येणार आहेत. पुरस्कार सोहळा शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी दादर येथे संपन्न होणार आहे.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांनी सुनील पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
( हेही वाचा : पुन्हा प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला वेग, दुकानांची झाडाझडती सुरु )
Join Our WhatsApp Community