PF ची माहिती आता DigiLocker वरही उपलब्ध

106

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांना डिजिलाॅकर सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणा ईपीएफओने केली असून, या सुविधेवरुन सदस्य आता यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि स्कीम सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकतील.

ईपीएफओशी सर्व दस्ताऐवज आता डिजिलाॅकरवरुन डाऊनलोड करता येतील. त्यात यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर व स्कीम सर्टिफिकेट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

नोकरदारांसाठी यूएएन महत्त्वपूर्ण

नोकरदारांसाठी यूएएन अत्यंत आवश्यक दस्तऐवज आहे. त्यातून कर्मचारी अनेक कंपन्यांतील आपल्या ईपीएफओ खात्यांवर नजर ठेवू शकतो.

( हेही वाचा: अमेरिका,चीन या देशांच्या महागाई दरापेक्षा भारताचा महागाई दर कमी- मंत्री भागवत कराड )

काय आहे डिजिलाॅकर?

  • डिजिलाॅकर सुविधा ही डिजिटल इंडिया प्रोग्राम अंतर्गत सुरु करण्यात आलेली ऑनलाईन सुविधा आहे.
  • इलेक्ट्राॅनिक्स आणि आयटी मंत्रालयाअंतर्गत ही सुविधा कार्यरत आहे. त्याद्वारे नागरिकांना डिजिटल डाॅक्युमेंट वाॅलेट उपलब्ध करुन दिले आहे.
  • अस्सल डिजिटल दस्तऐवज सबलीकरण करणे यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

EPS सर्टिफिकेट

ईपीएस सर्टिफिकेटमध्ये कर्मचा-यांच्या सेवेचा संपूर्ण तपशील असतो. याशिवाय कर्मचा-यांचा सेवा कालावधी, कौटुंबिक तपशील, तसेच कर्मचा-यांच्या माघारी कोणाला पेन्शन मिळावी याचा तपशील असतो.

काय आहे EPFO?

15 नोव्हेंबर 1951 रोजी एका अध्यादेशाद्वारे ईपीएफओची स्थापना केली होती. 1952 मध्ये कर्मचारी भविष्य निधी कायदा आणण्यात आला. ईपीएफओद्वारे काॅट्रीब्युटरी प्राॅव्हिडंट फंड, पेन्शन योजना आणि संघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी विमा योजना चालवली जाते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.