माटुंग्यातील उद्यानात समुद्री जलचरांची हजेरी!

माटुंगा येथील केदारनाथ हे उद्यान बच्चे कंपनीसाठी एका मत्सालयापेक्षा कमी बनले नाही. या उद्यानाच्या भिंती तुम्हाला प्रत्यक्ष निखळ समुद्राचा अनुभव करून देतात. 

सागरी जैवविविधता अनुभवायची असेल, तर आपल्याला मत्सालयात जावे लागते किंवा स्क्युबा डायविंग करावे लागते. परंतु आता अगदी तसाच आभास निर्माण करणारी सागरी जैव सृष्टी बच्चे कंपनीला पाहायला मिळणार आहे. माटुंग्यातील महापालिकेच्या उद्यानामध्ये चित्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. भाजपच्या स्थानिक नगरसेविका नेहल शहा यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम साकारला आहे.

उद्यानाची भिंत समुद्री तटच!

माटुंगा येथील केदारनाथ हे उद्यान बच्चे कंपनीसाठी एका मत्सालयापेक्षा कमी बनले नाही. या उद्यानाच्या भिंती तुम्हाला प्रत्यक्ष निखळ समुद्राचा अनुभव करून देतात. इथे न केवळ समुद्रातील जलचरांची चित्रे रेखाटली आहेत, तर समुद्रातील स्वच्छ पाण्यातून सैर करताना अलगद पाण्याच्या वरील बाजुस फिरताना किंवा स्क्युबा डायविंग करताना जो अनुभव येईल तसा आभास निर्माण होत आहे. त्यामुळे उद्यानाची ती भिंत एकप्रकारे समुद्राचा तटच आहेत, असे वाटते.

(हेही वाचा : अधिवेशनात सिनिअरपुढे ज्युनिअर आमदारांना ‘बोलता’ येईना!)

मुलांमध्ये प्रबोधन होईल!

केदारनाथ हे उद्यान भाजप नगरसेविका नेहल शहा यांच्या प्रभागात येत असून त्यांना याबाबत विचारले असता त्या म्हणााल्या, जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून उद्यानाच्या भिंतींना रंग मारण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा मी त्यांना या भिंतीवर एखादी थिम डोळ्यांसमोर ठेवून रंगवली जावी, अशी सूचना केली. त्यानुसार माझ्या  डोळ्यांसमोर समुद्रातील जलप्रदूषण आणि त्यामुळे त्यातील नष्ट होणारी जैव सृष्टी हा विषय आला. सागरी जलचरांची चित्रे ही समुद्रातील स्वच्छ पाण्यातून विहार करताना रेखाटली जावीत, अशी संकल्पना मांडली गेली. त्याप्रमाणे ती चित्रे रेखटली गेली. आज सजीव समुद्री जलचर आणि वनस्पती ह्या वाढत्या जलप्रदुषणामुळे नष्ट होत आहेत. जर समुद्रातील जलप्रदूषण रोखून समुद्राचे पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व जीव सृष्टी नष्ट होण्यापासून वाचू शकतात. त्याचा एक संदेशच या चित्राच्या माध्यमातून देताना बच्चे कंपनीलाही ही चित्रे पाहताना वेगळ्या प्रकारचा आनंद मिळेल, याचा विचार करण्यात आला आहे. त्याच बरोबर या बच्चे कंपनीला समुद्रातील जलप्रदूषण रोखल्यास आपल्या समुद्रात असेच जलचर पाहता येतील, असे पटवून देत एकप्रकारे पर्यावरणाचा संदेश त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्नही असल्याचे शहा यांनी सांगितले.

उद्यानाला अॅक्वेरियमचे स्वरुप  

ही संकल्पना नगरसेविका म्हणून माझी असली, तरी एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे ती साकारली गेली आहे. यामध्ये एफ उत्तर विभागाच्या देखभाल विभागाचे दुय्यम अभियंता प्रविण भोसले, कनिष्ठ अभियंता श्रद्धा चव्हाण, उद्यान विभागाचे संदीप राऊत यांची विशेष मेहनत आहे. ही सर्व टिम काही तरी वेगळ्या प्रकारचे काम करण्यासाठी धडपडत असते आणि नवीन संकल्पनेवर त्यांना काम करायला आवडते. त्यामुळेच या उद्यानाला अॅक्वेरियमचे स्वरुप पाहायला मिळाले आहे, असे नेहल शहा यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलतांना स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here