Pilot Salary in India : भारतात व्यावसायिक विमानचालकांना किती पगार मिळतो?

Pilot Salary in India : विमानचालकांचा पगार, विमान कंपनी आणि कामाच्या अनुभवाप्रमाणे बदलतो.

183
Pilot Salary in India : भारतात व्यावसायिक विमानचालकांना किती पगार मिळतो?
  • ऋजुता लुकतुके

विमान उड्डयण ही भारतातच नाही तर जगभरात उच्च कौशल्याची आणि त्यामुळे प्रतिष्ठेची नोकरी आहे. या कामासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणही तसंच काटेकोर लागतं. त्यामुळे पगारही चांगला मिळतो. भारतात सरासरी विमान चालकाला दर महिन्याला १ ते २ लाख रुपये मिळतात आणि वार्षिक पगार १० ते ५० लाखांच्या दरम्यान असतो. पण, अनुभवी विमानचालक वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षाही जास्त पगार कमावू शकतात. विमानचालक होण्यासाठी लागणारं प्रशिक्षण कौशल्याचे विविध स्तर या सगळ्यांची महिती घेऊया. विमानांचेही विविध प्रकार असतात. त्या सगळ्या प्रकारची विमानं चालवण्याचा वेगवेगळा अनुभव असतो आणि पगारवाढ मिळताता हा अनुभव लक्षात घेतला जातो. (Pilot Salary in India)

प्रशिक्षणानंतर अननुभवी असलेल्या विमानचालकांची सुरुवात मासिक १ ते ३ लाख रुपयांपासून होते. असे विमानचालक ज्युनिअर किंवा फर्स्ट ऑफिसर म्हणून कामावर रुजू होतात. त्यांना पूर्णपणे एकट्याच्या जबाबदारीवर विमान चालवण्याची जबाबदारी शक्यतो दिली जात नाही आणि सुरुवातीला ते छोटी विमानं आणि देशांतर्गत मार्गांवरच कार्यरत असतात. ३ त ७ वर्षांचा अनुभव जमा झाल्यावर तुम्हाला वरिष्ठ फर्स्ट ऑफिसर म्हणून काम करता येतं. इथे तुमचा पगार २ ते ७ लाख रुपये मासिक पर्यंत वर जातो. तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्याही तोपर्यंत वाढतात आणि प्रत्यक्ष विमान चालवण्याचे तास वाढल्यामुळे पगारात वाढ होत जाते. तुम्ही एकट्याने विमान चालवू शकाल अशी जबाबदारी तुमच्यावर येते. शिवाय ड्रीमलाईनर, क्रूझर अशी अवाढव्य विमानंही तुम्ही चालवायला शिकता. या स्तरावर तुमचा वार्षिक पगार २० ते ५० लाख रुपये इतका असू शकतो. (Pilot Salary in India)

(हेही वाचा – Unani College: रायगड जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार राज्याचे पहिले शासकीय युनानी महाविद्यालय )

१० वर्षांपेक्षा जास्त अनुभव जमा झाल्यावर तुम्ही वरिष्ठ कॅप्टन किंवा वरिष्ठ इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम करू शकता. अशावेळी तुमचा पगार ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असतो. आणि वार्षक पगार १ कोटी रुपयांच्या वरही जाऊ शकतो. नियमित पगाराबरोबरच तुम्ही प्रवास करता त्या ठिकाणी तुमच्या होणाऱ्या खर्चासाठी तुम्हाला दैनंदिन भत्ताही मिळत असतो. तो स्थानिक चलनात मिळतो आणि विमान कंपन्यांनुसार हा भत्ता वेगवेगळा असतो. तुमच्या कामाचा अनुभव, तुम्ही कोणत्या प्रकारची विमानं चालवू शकता, कुठल्या विमान कंपनीत तुम्ही काम करता आणि तुम्ही काम करता त्या ठिकाणच्या राहणीमानाचा अंदाज घेऊन तुमचा पगार ठरत असतो. भारतात सर्वाधिक पगार एअर इंडिया कंपनी देते. तर सगळ्यात कमी पगार स्पाईटजेटचे आहेत. (Pilot Salary in India)

विमानचालक होण्यासाठी भारतात तुम्हाला १२ वी पर्यंतचं शिक्षण अनिवार्य आहे आणि बारावीत भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर डीजीसीएची मान्यता असलेल्या फ्लाईंग क्लबमधून तुम्हाला विमान चालवायचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्यासाठी वैद्यकीय चाचणीही अत्यावश्यक आहे. तुम्हाला कुठलेही रोग किंवा व्याधी असता कामा नयेत आणि तुमची दृष्टीही चांगली हवी. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण केल्यावर विमानचालकाचा परवाना मिळू शकतो. शिवाय तुमच्याकडे डीजीसीएचा नोंदणी क्रमांकही असावा लागतो. (Pilot Salary in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.