Pipal Tree: २४ तास ऑक्सिजन पुरवणाऱ्या पिंपळाच्या झाडाचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहिती आहेत का?

447
Pipal Tree: २४ तास ऑक्सिजन पुरवणाऱ्या पिंपळाच्या झाडाचे 'हे' उपयोग तुम्हाला माहिती आहेत का?
Pipal Tree: २४ तास ऑक्सिजन पुरवणाऱ्या पिंपळाच्या झाडाचे 'हे' उपयोग तुम्हाला माहिती आहेत का?

पिंपळाचे झाड (Pipal Tree) सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू, केशव, फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये देव हरि आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो. पिंपळ वृक्ष (Pipal Tree) हे भगवान विष्णूचे रूप आहे. महात्मा या झाडाची सेवा करतात आणि हे झाड मानवाच्या दुष्कृत्यांचा नाश करणार आहे. पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे. याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. (Pipal Tree)

(हेही वाचा –Char Dham Yatra : चारधाम यात्रेला जाणार असाल, तर ‘हे’ तुम्हाला माहीत हवेच, जाणून घ्या…)

तसेच शनि दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्ष (Pipal Tree) म्हटले जाते. पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे ही मानले जाते. पिंपळाचे झाड २५०० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगू शकते. झाडाचा वाढीचा कालावधी काही प्रकरणांमध्ये ५०- ३००० वर्षे किंवा त्याहून अधिक असतो. (Pipal Tree)

पिंपळाच्या पानांत असतात औषधी गुणधर्म

पिंपळाच्या झाडाच्या (Pipal Tree) प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या झाडाचा उपयोग विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. या झाडाची पाने, साल, देठ, बिया, फळे यांचा औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो. पिंपळाच्या झाडाची पाने बद्धकोष्ठता, अतिसार आणि रक्ताशी संबंधित समस्या दूर करतात. कारण पिंपळाच्या पानांमध्ये ग्लुकोज, ऑस्टियोरिड, फिनोलिक असे गुणधर्म असतात. (Pipal Tree)

आरोग्याशिवाय पिंपळाच्या पानाचे इतरही फायदे आहेत. तुमच्या त्वचेसाठीदेखील याचा फायदा तुम्हाला करून घेता येतो. त्वचेवरील लालसरपणा कमी होतो. चेहऱ्यावरील पुरळांसाठी फायदेशीर ठरते. जखमेवर उत्तम उपाय म्हणून तुम्ही याचा वापर करु शकता. पिंपळाची पानेही (Pipal Tree) डोळ्यांसाठीही फायद्याची आहेत. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. (Pipal Tree)

श्वासाच्या त्रासासाठी गुणकारी

बऱ्याच जणांना श्वासाचा म्हणजेच दम्याचा त्रास असतो. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या (Pipal Tree) सुक्या फळांचा उपयोग करून घेऊ शकता. पिंपळाची सुकी फळं तुम्ही वाटून घ्या आणि साधारण 2-3 ग्रॅम या प्रमाणात 14 दिवस पाण्यातून सकाळ संध्याकाळ तुम्ही घ्या. यामुळे श्वासाचा आजार आणि खोकला निघून जाण्यास मदत होईल.

दातांसाठी फायद्याचे

पिंपळाची साल (Pipal Tree) पाण्यात उकळून घेऊन त्याची चूळ भरल्यास, दातांचे आजार बरे होतात. तसंच पिंपळाची ताजी वेल घेऊन रोज तुम्ही त्याने दात घासले तर दात मजबूत होतात. दातदुखी कमी होते आणि हिरड्यांची सूज, तोंडातून येणारी दुर्गंधीही निघून जाते. याशिवाय तुम्ही पिंपळाची साल, कत्था आणि 2 ग्रॅम काळी मिरी एकत्र करून वाटून घ्या आणि याची पावडर रोज दाताला लावा. यामुळे तुम्हाला दातांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल. (Pipal Tree)

हृदयरोगासाठी फायदेशीर

आजकालची खराब लाईफस्टाईल आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या वाढत आहेत. त्यातच महत्त्वाची समस्या म्हणजे हृदयरोग. हृदरोगापासून वाचायचे असेल तर तुम्ही पिंपळाची 15-20 पानं घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून गाळून घ्या. हा काढा तुम्ही दर तीन तासाने दिवसभर प्या. असं केल्याने तुम्हाला हार्टअटॅक येण्याचा धोका कमी होतो. (Pipal Tree)

पिंपळाचे झाड हे अशा अनेक समस्यांवर गुणकारी आहे. त्यामुळे त्यास जीवनाचे प्रतीक म्हणूनही मानले जाते.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.