गूगल डूडल नवनवीन संकल्पनेने कायम युझर्सला आकर्षित करत असते. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडती डिश म्हणजेच पिझ्झा. गुगलने पिझ्झावर खास डूडल बनवले आहे. यंदा पिझ्झा डे साजरा करण्यासाठी गूगल डूडलने मिनी गेम जारी केला आहे.
गूगलकडून मिळणार स्टार
६ डिसेंबर २००७ मध्ये, युनेस्कोने (UNESCO) नेपोलिटनची “Pizzaiuolo” ही पाककृती आपल्या यादीत समाविष्ट केली. याचे मानवतेचे अमूर्त सांस्कृतिक म्हणून वर्णन केले गेले. यामुळेच गुगल डूडलमध्ये लोकप्रिय पिझ्झा डिशचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यपृष्ठावरील Google लोगोवर क्लिक करून हा गेम खेळू शकतो. गेममधील आव्हान म्हणजे ऑर्डर केलेल्या पिझ्झाच्या प्रकारावर आधारित या गेममध्ये पिझ्झा स्लाइस कापणे. ऑर्डर जितकी अचूक असेल, खेडाळूला गूगलकडून तितके जास्त स्टार देण्यात येतील.
( हेही वाचा : ‘म्हाडा’विजेत्यांना दिलासा! शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ )
सर्च जायंटच्या डूडलमध्ये खेळाडूंना पिझ्झाचे काही तुकडे करावे लागतात. मिनी-गेममध्ये मार्गेरिटा ते मिष्टान्न पिझ्झा पर्यंतचे 11 विविध फ्लेवर्सचे पिझ्झा आहेत. गुगल डूडल मिनी-गेममधील पिझ्झा या क्रमाने आहेत — मार्गेरिटा पिझ्झा, पेपरोनी पिझ्झा, व्हाइट पिझ्झा, कॅलाब्रेसा पिझ्झा, मुझारेला पिझ्झा, हवाईयन पिझ्झा, मॅग्यारोस पिझ्झा, तेरियाकी मेयोनेझ पिझ्झा, टॉम यम पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा आणि डेझर्ट पिझ्झा.
Join Our WhatsApp Community