Places To Visit In Wayanad : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वायनाडमध्ये ‘या’ स्थळांना नक्की भेट द्या

139
Places To Visit In Wayanad : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वायनाडमध्ये 'या' स्थळांना नक्की भेट द्या

देवभूमी म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये वायनाड नावाचे सुंदर स्थळ आहे. वायनाडमध्ये अनेक आकर्षक धबधबे, ऐतिहासिक गुहा, मंदिरे आहेत. तसेच वायनाड हे मसाल्याच्या बागांसाठी आणि वन्यजीवांसाठी देखील प्रसिद्ध आहे. तसेच वायनाडमध्ये पाहण्यासारखी इतरही अनेक ठिकाणे आहेत, जी प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतात. (Places To Visit In Wayanad)

जर तुम्ही फिरण्याची योजना आखत असाल आणि तुम्हाला शांत आणि स्वच्छ वातावरण हवे असेल तर वायनाड हे तुमच्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. चला तर वायनाडमधील प्रसिद्ध ठिकाणांविषयी जाणून घेऊया. (Places To Visit In Wayanad)

१. बाणासूर सागर धरण

वायनाडच्या कुशीत विशाल बाणासूर सागर धरण आहे. हे धरण भारतातील सर्वात मोठे धरण आहे. इथले दृश्य नयनरम्य आहे. निळ्या आकाशाखाली पर्वतांनी झाकलेला पाण्याचा हा विशाल भाग पाहून आपण वेगळ्याच जगात गेल्याचा भास होतो. शहरातून तुम्ही इथे बस किंवा टॅक्सीने पोहोचू शकता. (Places To Visit In Wayanad)

२. वायनाड वन्यजीव अभयारण्य

वायनाड वन्यजीव अभयारण्य हे केरळमधील दुसरे सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे. सुंदर झाडे आणि प्राणी या दोन्हींच्या दुर्मिळ तसेच लुप्तप्राय प्रजाती इथे पाहायला मिळतील. हे तामिळनाडूमधील मुदुमलाई तसेच कर्नाटकातील नागरहोल आणि बांदीपूरच्या संरक्षित क्षेत्रांनी वेढलेले आहे. या अभयारण्याची स्थापना १९७३ साली करण्यात आली. या प्रदेशात निलगिरी, तसेच बांबूची झाडे उगवली जातात. (Places To Visit In Wayanad)

३. फँटम रॉक

फँटम रॉक हे मुख्य वायनाड शहरापासून फक्त ११ किलोमीटर अंतरावर आहे. फँटम रॉक जवळ काही उंचीवर काही तलाव आहेत. जिथे तुम्ही जाऊन थोडा वेळ घालवू शकता. वायनाडमधील हे एक मनोरंजक आणि अनोखे ठिकाण आहे कारण येथील खडकाची रचना अगदी बसलेल्या व्यक्तीसारखी आहे. विशेष म्हणजे मानवी चेहऱ्यासारखा दिसणारा या खडकाचा वरचा भाग खडकाशी जोडलेला नसून तो फक्त खडकावर ठेवलेला आहे. (Places To Visit In Wayanad)

(हेही वाचा – Kalyan Station : कल्याण स्टेशनवर उतरल्यावर ‘या’ सुविधांचा लाभ अवश्य घ्या)

४. एडक्कल लेणी

एडक्कल लेणी प्राचीन दगडी कोरीवकामांसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला शतकानुशतके जुने कोरीव काम दिसेल. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला काळाचे भान राहत नाही. तुम्ही आपसुकच इतिहासात विहार करु लागता. इथला प्रत्येक भाग चमत्काराने रचलेला आहे. (Places To Visit In Wayanad)

५. चेंबरा शिखर

मेप्पाडीच्या जवळ आणि कलपेट्टाच्या दक्षिणेस फक्त ८ किमी अंतरावर स्थित, चेंबरा शिखर हे वायनाड पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर आहे. सभोवतालची हिरवळ आणि हृदयाच्या आकाराचे तलाव पाहण्यासाठी बहुतेक पर्यटक येथे येतात. चेंबरा शिखर संपूर्ण वायनाड जिल्ह्याचेच नव्हे तर कोझिकोड, मलप्पुरम आणि निलगिरी जिल्ह्यांच्या मोठ्या भागाचे मनमोहक दृश्य दाखवते. (Places To Visit In Wayanad)

६. अल्ट्रा पार्क

तुम्हाला धम्माल, मस्ती करायची असेल तर अल्ट्रा पार्कला नक्की भेट द्या. या ॲडव्हेंचर पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ३०० रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागेल. या ३०० रुपयांमध्ये तुम्ही उद्यानात प्रवेश करून उद्यानात बांधलेल्या काचेच्या पुलावर जाऊ शकता. या उद्यानात तुम्ही प्रचंड आनंद लुटू शकता. (Places To Visit In Wayanad)

७. कुरुवा बेट

आपण स्वप्नातही इतके सुंदर दृश्य पाहण्याची कल्पना करु शकत नाही. कुरुवा बेटवर पाऊल टाकल्यावर तुम्हाला स्वर्ग नगरीत आल्याचा भास होईल. नद्यांनी वेढलेले, झाडाझुडपांची समृद्ध हे बेट पृथ्वीचा एक अद्भुत भाग आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, नदीचा खळखळाट एका नैसर्गिक संगीताची रचना करतात. नैसर्गिक ठिकाणी तुम्हाला रमायला आवडत असेल तर या बेटाला अवश्य भेट द्या. (Places To Visit In Wayanad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.