उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रिसॉर्ट, समुद्रकिनारी जाणाऱ्या लोकांचा ओघ वाढतो. समुद्रावर गेल्यावर लाटांचा आनंद घेणे, सूर्यास्त पाहणे यापलीकडे आता समुद्री खेळ ( Water Sports) पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहेत.
१. मालवण – स्कुबा डायव्हिंग ( Scuba Diving)
दरवर्षी लाखो पर्यटक मालवणला भेट देतात, याचे प्रमुख कारण आहे स्कुबा डायव्हिंग. मालवण किनाऱ्यावर तुम्ही स्कूबा डायव्हिंग व्यतिरिक्त, बंपर राइड, बनाना राइड आणि पॅरासेलिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता.
( हेही वाचा : आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण )
२. अलिबाग – जेट स्की (Jet Ski)
मुंबईपासून जवळ असल्यामुळे अलिबागला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही जेट स्की या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
३. तारकर्ली – पॅरासेलिंग (Parasailing)
पॅरासेलिंगमुळे तुम्हाला आकाशातून संपूर्ण समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येईल. तारकर्ली हा समुद्रकिनारा कोकणातील सर्वात लोकप्रिय व स्वच्छ समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणी पर्यटक आवर्जून पॅरासेलिंग करण्यास प्राधान्य देतात.
४. कोलाड – रिव्हर राफ्टिंग ( River rafting)
भारतातील सर्वात वेगवान नद्यांपैकी एक असलेल्या कुंडलिका नदीच्या कडेला कोलाड येथे तुम्ही व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
५. विहीगाव – वॉटर रॅपलिंग ( Water rappelling )
पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र धबधबे दिसू लागतात. कोंढाणा लेणी, सांधण व्हॅली, दाभोसा आणि विहिगाव धबधबे याठिकाणी तुम्ही वॉटर रॅपलिंगचा आनंद घेऊ शकता.
Join Our WhatsApp Community