भारत सरकारकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. सध्याचं सरकार हे आपल्या देशबांधवांसाठी खूप जागरूक आहे. त्यांच्या कल्याणासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महागड्या वीज बिलांपासून आर्थिक दृष्ट्या मध्यम आणि गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी देशातल्या १ कोटी घरांमध्ये पीएम सूर्य घर सौर पॅनेल बसवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या मोहिमेमुळे हरित ऊर्जा अभियानाला चालना मिळेल आणि पर्यावरणाचा संतुलन राखण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील.
यावर्षी १ फेब्रुवारीच्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना, छतावरची सौरऊर्जा आणि मोफत वीज सुरू करण्याची घोषणा केली होती. (pm surya ghar muft bijli yojana)
(हेही वाचा – Nagpur Violence: हिंसाचार घडवणाऱ्यांविरोधात बुलडोझर कारवाई करा; हेमंत पाटील यांची मागणी)
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचे उद्दिष्ट
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून १ कोटी घरांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज पुरवली जाईल. या योजनेद्वारे १ कोटी कुटुंबांची वर्षाला १५००० कोटी युनिट्सची बचत होईल. ते त्यांच्या क्षेत्रातल्या वीज वितरण कंपन्यांना म्हणजेच DISCOMs ना त्यांच्याकडे उरलेली अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवू शकतात.
या योजनेमुळे इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंगची सुविधा वाढेल आणि सोलर पॅनल पुरवठा आणि इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून तरुणांना उद्योजक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होईल. याबरोबरच सोलर पॅनल निर्मिती, इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्समध्ये टेक्निकल इंटेलिजन्स असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण केल्या जातील. (pm surya ghar muft bijli yojana)
- योजनेचं नाव – पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
- लाभार्थी – देशातले नागरिक
- योजनेचा उद्देश – मोफत वीज उपलब्ध करून देणे
- लाभ – ३०० युनिट मोफत वीज आणि सौर पॅनेल इन्स्टॉलेशन
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
- अधिकृत वेबसाइट – pmsuryaghar.gov.in
(हेही वाचा – Farmers Protest : ७०० शेतकरी आंदोलकांना अटक; पंजाबमधील आप सरकारची आंदोलकांवर कारवाई)
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत :
- भारतातले मूळ रहिवासी या योजनेसाठी पात्र असतील.
- या योजनेत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- या योजनेसाठी मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
ही योजना प्रत्येक जातीच्या लोकांना लागू असेल
- योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
- पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे. (pm surya ghar muft bijli yojana)
(हेही वाचा – Budget Session : मविआचा सभापती-अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप; विधानमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन)
जर एखाद्या व्यक्तीला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी पात्र व्हायचं असेल, तर त्याच्याकडे खालील महत्त्वाची कागदपत्रे असणे अनिवार्य आहे : (pm surya ghar muft bijli yojana)
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- वीज बिल
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शिधापत्रिका
- मोबाईल क्र.
- हमीपत्र
- उत्पन्नाचं प्रमाणपत्र
हेही पहा –
Join Our WhatsApp Community