-
ऋजुता लुकतुके
पोको फोन हे अलीकडे तरुणांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. मीडिया डिमेन्शन प्रोसेसरमुळे गेमिंगचा चांगला अनुभव आणि नवीन रंग संगती तसंच हटके लुक असलेला कॅमेरा आयलंड ही वैशिष्ट्य पोकोच्या नवीन एक्स७ मालिकेतही सामावलेली आहेत. जगभरात ही मालिका लाँच करताना यावेळी भारतातही एकाच वेळी एक्स७ आणि एक्स७ प्रो हे दोन पोको फोन लाँच झाले आहेत. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक फिचर तुलनेनं कमी पैशात ही कंपनी देऊ करते. ते वैशिष्ट्यही या मालिकेनं जपलं आहे. (Poco X7 Series)
(हेही वाचा- प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? Mumbai High Court ने मुंबई महापालिकेला घेतले फैलावर)
पोको एक्स६ च्या तुलनेत या फोनमधील चिप जलद काम करते. शिवाय डिस्प्ले आणि कॅमेराही चांगला आहे. रंगसंगती म्हणाल तर पिवळा धम्मक रंग आणि त्याला काळ्या रंगाचं कॅमेरा आयलंड असं एक फोनचं डिझाईन आहे. तर इतर दोन रंग आहेत निळा आणि हिरवा. पोको फोनची वैशिष्ट्य आधी बघूया, (Poco X7 Series)
-
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोन १९,९९९ रुपयांपासून मिळेल
-
पोको एक्स७ आणि पोको एक्स७ प्रो अशी दोन मॉडेल लाँच झाली आहेत एक्स७ प्रोची किंमत २६,९९९ रुपये इतकी आहे
-
१४ जानेवारीला फ्लिपकार्टवर हा फोन पहिल्यांदा उपलब्ध होईल. त्यानंतर दुकानांतून विक्री सुरू होईल ती १७ जानेवारीपासून
-
पोको येलो, ग्लेसियर ग्रीन आणि कॉस्मिक सिल्व्हर या रंगात फोन उपलब्ध असेल.
-
काही बँकांच्या क्रेडिट कार्डावर तुम्हाला सवलतीच्या दरात फोन उपलब्ध होऊ शकेल
Welcoming @akshaykumar to the POCO family! His unstoppable spirit is a perfect match for our Made of MAD ethos.
Get ready to break barriers with us tomorrow, Jan 9th, at 5:30 PM, as we unveil the POCO X7 Series and show you how to Xceed Your Limits. 💥 #POCOX7Series #MadeOfMAD pic.twitter.com/JfLMfU8Zca
— Himanshu Tandon (@Himanshu_POCO) January 8, 2025
पोको एक्स७ |
पोको एक्स७ प्रो |
|
८ जीबी + १२८ जीबी |
१९,९९९ |
उपलब्ध नाही |
८ जीबी + २५६ जीबी |
२१,९९९ |
२४,९९९ |
१२ जीबी + २५६ जीबी |
उपलब्ध नाही |
२६,९९९ |
पोको एक्स७ चा डिस्प्ले ६.६७ इंचांचा तर एक्स७ प्रोचा डिस्प्ले ६.७३ इंचांचा आहे. दोन्ही फोनमध्ये प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर प्रो मॉडेलमध्ये अल्ट्रावाईड आणि टेलिफोटो लेन्सही देण्यात आल्या आहेत. प्रो मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक डिमेन्सिटी ८४०० अल्ट्रा हा अत्याधुनिक प्रोसेसर वापरला आहे. शिवाय रॅमही अद्ययावत आहे. तर प्राथमिक कॅमेरा सोनीचा वापरला आहे. फोनची बॅटरीही ६,५५० एमएएच क्षमतेची असून ९० मेगावॅटचा टर्बो चार्जरही फोनबरोबर उपलब्ध आहे. (Poco X7 Series)
(हेही वाचा- CM Devendra Fadnavis साहेब, महापालिकेच्या सुमारे १० हजार कोटींच्या थकीत रकमेचे काय करता?)
अँड्रॉईड १५ वर आधारित हा फोन असून त्यात एआय नोट्स, एआय रेकॉर्डर आणि एआय सबटायटल्स असे फिचर आहेत. एक्स७ फोनमध्ये एआयचे मॅजिक इरेझ प्रो आणि नाईट मोड हे फिचर आहेत. या फोनला मोटोरोला एज, वनप्लस नॉर्ड या फोनची स्पर्धा असेल. (Poco X7 Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community