-
ऋजुता लुकतुके
गेल्या आठवड्यात एकूणच शेअर बाजारात पडझडीचं वातावरण असताना एका बातमीकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही. पण, बातमी होती, अल्ट्राटेक या कंपनीचा वायर निर्मिती क्षेत्रातील प्रवेश. त्यांनी तसं ऐलान केल्यावर आगामी स्पर्धा पाहता पॉलीकॅब हॅवेल्स, केवाय अशा सगळ्याच वायर निर्मिती कंपन्यांचे शेअर खाली यायला सुरुवात झाली. गुरुवारच्या दिवशी तर पॉलीकॅबमध्ये तब्बल १५ टक्क्यांची घसरण झाली. (Polycab Share Price)
अखेर शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर ५,०५८ अंशांवर स्थिरावला आहे. तरी त्यात १८ अंशांची घसऱण झाली. अल्ट्राटेक कंपनी येत्या दोन वर्षांत १८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून गुजरातच्या भरुचमध्ये वायर निर्मिती करणारी कंपनी उभारणार आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत ही कंपनी उभी राहण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या दिवसांत या शेअरवर त्याचे आणखी पडसाद उमटू शकतात. (Polycab Share Price)
(हेही वाचा – Water Sports in Goa : गोव्यातील समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असलेली ही ५ ठिकाणं)
पॉलीकॅब ही देशातील सगळ्यात मोठी केबल उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे २८ उत्पादक कारखाने भारतात कार्यान्वित आहेत आणि १९६४ पासून ही कंपनी या उद्योगात आहे. सुरुवातीला या क्षेत्रातील एकमेव भारतीय कंपनी असल्याचा फायदाही कंपनीला मिळाला. पण, पुढे पुढे स्पर्धा वाढली. सध्या कंपनीचा एकूण महसूल हा १,८०२ कोटी रुपयांच्या घरात आहे आणि कंपनीत ४,००० च्या वर कर्मचारी कार्यरत आहेत. (Polycab Share Price)
शेअर बाजाराचा विचार केला तर पॉलीकॅब इंडियावर याच कामगिरीच्या जोरावर गुतंवणूकदारांचा चांगला विश्वास आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे शेअर ३२ टक्क्यांनी वाढले आहेत. तर म्युच्युअल फंड कंपन्यांनीही डिसेंबर २०२४ नंतर आपली या शेअरमधील गुंतवणूक ६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर नेली आहे. तर किरकोळ गुंतणूकदारांनीही या कंपनीत ३.५८ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत आणि आताही मॉर्गन स्टॅनली या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थेनं शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. पण, येत्या दिवसांत शेअरची वाटचाल जवळून अभ्यासण्याची गरज आहे. (Polycab Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community