Investment Tips : पोस्टात ५ वर्षांत १३.९० लाखांचा परतावा; काय आहे ही सरकारी योजना

112

भविष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. देशात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते पोस्ट ऑफिस गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात आणि तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. तुम्हाला ५ वर्षात १३.९० लाख मिळवण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या प्रयत्नांना यश! कंत्राटी भरतीला शासनाची स्थगिती)

पोस्ट ऑफिस नॅशन सेव्हिंग सर्टिफिकेट योजना 

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची (NSC) सुविधा पोस्ट ऑफिसद्वारे ग्राहकांना प्रदान केली जाते. या योजनेत ग्राहकांना बंपर परतावा मिळतो. तुम्ही NSC मध्ये एकापेक्षा जास्त खाती उघडू शकता. तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत अनेक सवलतींचा लाभ मिळतो. गुंतवणूकदारांना या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या योजनेत १ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला पुढील ५ वर्षांनी १ हजार ३८९.४९ रुपये मिळतील.

१३.९० लाख रुपये किती रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात?

जर तुम्ही या योजनेत १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर ५ वर्षांच्या मुदतीनंतर ग्राहकांना १३ लाख ८९ हजार ४९३ रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला ३ लाख ८९ हजार ४९३ रुपये हमी व्याज मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.