Post Office Scheme : दररोज फक्त ५० रुपये गुंतवा, ३५ लाखांपर्यंत परतावा मिळवा; जाणून घ्या या सरकारी योजनेविषयी…

सध्या अनेक लोक शेअर बाजार, म्युच्युएअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. परंतु कोणतीही रिस्क न घेता गुंतवणूक करण्यास इच्छुक लोकांसाठी भारतीय पोस्ट विभागाची ग्रामसुरक्षा योजना अत्यंत योग्य आहे. पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेमुळे मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या योजनेत तुम्ही दररोज ५० रुपये म्हणजे दरमहा १५१५ रुपये जमा करून ३५ लाखांचा फंड तयार करू शकता. ग्राम सुरक्षा योजना ही ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना या कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही विमा पॉलिसी १९९५ मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आली होती.

( हेही वाचा : Post Office Scheme : केवळ ३९९ रुपयांमध्ये पोस्टाकडून मिळेल १० लाखांचा अपघाती विमा! जाणून घ्या संपूर्ण योजना)

काय आहे ग्रामसुरक्षा योजना

ग्रामसुरक्षा योजनेत भारतातील १९ वर्ष ते ५५ वर्षापर्यंतचा कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो. यात १० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ग्रामसुरक्षा योजनेचा संपूर्ण ३५ लाख रुपयांचा लाभ मिळतो. या योजनेची ही रक्कम गुंतवणूकदाराला ८०व्या वर्षी बोनससह दिली जाते. हा हप्ता गुंतवणूकदारांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरता येईल. वयाच्या १९व्या वर्षी पॉलिसी खरेदी केल्यास, ५५ वर्षांसाठी दरमहा १५१५ रुपये, ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये, तर ६० वर्षांसाठी तुम्हाला १४११ रुपये प्रीमियम भरावा लागेल.

किती बेनिफिट मिळेल ?

  • ५५ वर्ष – ३१.६० लाख
  • ५८ वर्ष – ३३.४० लाख
  • ६० वर्ष – ३४.६० लाख

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here