Investment Tips : पोस्टाच्या ‘या’ ४ योजना करतील तुम्हाला मालामाल; सुरक्षेचीही पूर्ण हमी, जाणून घ्या…

भविष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही कमी पैशांची गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवू शकता.

( हेही वाचा : Investment Tips : पोस्टात ५ वर्षांत १३.९० लाखांचा परतावा; काय आहे ही सरकारी योजना)

पोस्टाची पब्लिक प्रोव्हिडेंट फंड योजना ( Public Provident Fund)

पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड योजनेत गुंतवणूकदार दरवर्षी जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकतात. या योजनेत ग्राहकांना वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही जर दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवले आणि २५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक ३७ लाख ५० हजार रुपये होईल आणि २५ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम १.३ कोटी असेल यात तुम्हाला चक्रवाझ व्याजाचाही लाभ मिळेल.

रिकरिंग डिपॉझिट योजना 

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेत दर महिन्याला गुंतवणूक करून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेली कोणतेही मूल किंवा प्रौढ व्यक्तीच्या नावे आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत खाते उघडू शकतो. तुम्ही या खात्यात फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. ही योजना ५ वर्षांनी मॅच्युअर होते. पोस्ट ऑफिस आरडी खाते पैसे जम न करता ५ वर्षे चालू ठेवता येते. १ वर्षांनंतर तुम्ही ५० टक्क्यांपर्यंत कर्जही घेऊ शकता. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत १० वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये गुंतवले तर १० वर्षांनंतर तुम्हाला ५.८ टक्के व्याजदराने १६ लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतील. १० वर्षातील तुमची एकूण ठेव १२ हजार रुपये असेल तर तुम्हाला अंदाजे ४.२६ लाख परतावा मिळेल.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची (NSC) सुविधा पोस्ट ऑफिसद्वारे ग्राहकांना प्रदान केली जाते. गुंतवणूकदारांना या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या योजनेत १ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला पुढील ५ वर्षांनी १ हजार ३८९.४९ रुपये मिळतील. जर तुम्ही या योजनेत १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर ५ वर्षांच्या मुदतीनंतर ग्राहकांना १३ लाख ८९ हजार ४९३ रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला ३ लाख ८९ हजार ४९३ रुपये हमी व्याज मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

टाईम डिपॉझिट

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट अंतर्गत ५ वर्षांच्या ठेवीवर वार्षिक ६.७ टक्के व्याज उपलब्ध आहे. जर तुम्ही या योजनेत १५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here