आता पोस्टमन काका येणार ‘ई-बाइक’वर!

136

पोस्टाद्वारे बॅंकेची महत्त्वाची कागदपत्रे, सरकारी पत्रे पाठवली जातात. तसेच वैयक्तिक पत्राद्वारे सुख:दुखाची खबरबात पोस्टमन ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. सायकल किंवा पायी फिरणारे पोस्टमन आता लवकरच ‘ई-बाइक’वरून टपाल वाटप करताना दिसणार आहेत, पोस्टाच्या पुणे विभागाकडून राज्यात पहिल्यांदाच ‘ई-बाइक’च्या वापराचा प्रयोग सुरू केला गेला आहे.

( हेही वाचा : मुंबई विमानतळावरील धावपट्टी १८ ऑक्टोबरला एवढा वेळ बंद राहणार)

प्रायोगिक तत्वावर ‘ई-बाइक’ सेवा

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशात बंगळुरू शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे विभागाकडून या उपक्रमासाठी प्रायोगिक तत्वावर सहा ‘ई-बाइक’ वापरण्यात येत आहेत. पोस्टाच्या पिंपरी-चिंचवड (पूर्व) पार्सल सेवेसाठी या दुचाकी वापरण्यात येत असल्याची माहिती पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली.

पुणे विभागात सुमारे 400 ते 500 पोस्टमन आहेत. शहरात येणारी पत्रे, पोस्टाच्या माध्यमातून आलेल्या शासकीय नोटीस तसेच नागरिकांच्या पसंतीस उतरलेल्या पार्सल सेवेच्या माध्यमातून नागरिकांना घरापर्यंत पोस्टाकडून सेवा दिली जाते. ही सेवा देणारे पोस्टमन शहरात फिरण्यासाठी सायकल वापरतात तर काही पोस्टमन आजही आसपासच्या भागात चालत पत्र पोहचवितात. मात्र, आता केंद्र शासनाकडून ‘ई-वाहनांना’ प्रोत्साहन दिले जात आहे. मोहिमेला हातभार लावण्यासह वेगवेगळ्या सुविधा देत कात टाकणाऱ्या पोस्ट खात्यात आता लक्षणीय बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टमनसाठी ई-बाइक वापरण्यात येणार आहेत, त्याचा वापर राज्यात पुणे विभागातून सुरू करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.