पवई म्हणजे महाराष्ट्रातल्या मध्य मुंबई इथे असलेले एक निवासी क्षेत्र. हा भाग पवई (powai) तलावाच्या काठावर वसलेला आहे. पवईच्या आग्नेय दिशेला विक्रोळी पार्कसाइट, नैऋत्य दिशेला चांदिवली, एल. बी. एस. मार्ग म्हणजेच जुना मुंबई-आग्रा रस्ता आणि ईशान्य दिशेला सरोवराच्या पलीकडे उत्तर दिशेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तसंच इथला जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पश्चिमेकडच्या आणि पूर्वेकडच्या उपनगरांना जोडणारा शहरातील सर्वांत व्यस्त रहदारीच्या मार्गांपैकी एक मार्ग हा पवई मधून जातो. गणेश चतुर्थी उत्सवाच्या वेळी विसर्जन मिरवणुकीसाठी पवई तलाव येथे दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी देखील या ठिकाणी जमते. (powai mumbai maharashtra)
पवई कशासाठी प्रसिद्ध आहे?
तलाव
पवई (powai) हे उपनगर तलावाच्या काठावर वसलेलं आहे. या तलावातून संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे. इथे डेकोरेटिव्ह डेक बसवलेले आहेत. तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आणि कारंजे असलेली सुंदर बाग आहे.
शाळा आणि कॉलेज
१९५८ साली स्थापन करण्यात आलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि १९६३ साली स्थापन करण्यात आलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या दोन्ही संस्था पवई येथेच आहेत.
पवईमध्ये काही शाळा आणि कॉलेजेस आहेत. त्यांपैकी एस. एम. शेट्टी स्कूल आणि कॉलेज, गोपाल शर्मा स्कूल आणि चंद्रभान शर्मा कॉलेज आहेत. चांदिवली येथे सिंहगड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आहे. तसंच पवार पब्लिक स्कूल ही नव्याने सुरू झालेली एक शाळा आहे.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानची भारताशी टक्कर; भारताऐवजी श्रीलंकेला संधी?)
भारतीय कर विभाग
पवई (powai) या विभागात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, कस्टम्स आणि एनटीपीसीचं ऑफिस आहे.
सैनिकांचं निवासस्थान
तसंच पवई इथे माजी सैनिकांचं एक निवासी कॉम्प्लेक्सही आहे.
धर्मस्थळं
पवईतली काही मंदिरं जसं की, चिन्मय मिशनचं जगडेश्वर शिव मंदिर, हिरानंदानी इथलं श्री अयप्पा विष्णू मंदिर, चांदिवली इथलं देवी वाघेश्वरी माता मंदिर ही प्रसिद्ध मंदिरं आहेत. पवई येथे सामुदायिक हवन देखील आयोजित केला जातो. (powai mumbai maharashtra)
बिझनेस स्टार्टअप एरिया
हिरानंदानी यांच्यासारख्या अनेक उद्योजकांसह पवई हे मुंबईचे स्टार्ट-अप हब बनले आहे. इथे टेक्निकल बिझनेस मधल्या आयआयटी बॉम्बे सारख्या संस्थांनी तसंच इतर अनेक संस्थांनी पवई इथे त्यांच्या बिझनेसची मुळं रोवली आहेत. त्यामुळे या क्षेत्राला भारताची पवई व्हॅली म्हणून संबोधलं जातं.
पवई व्हॅली इथल्या काही स्टार्ट-अप्समध्ये जस्टराईड, हाऊसिंग, टायनी आऊल, टॉपर, होला शेफ, लॉजिक रुट्स, केअर २४, फ्लायरोब, नियरफॉक्स, बेलीटा, मिरची अँड मीम आणि क्रिस्पी गेम्स यांचाही समावेश आहे.
(हेही वाचा – Assembly Elections : विधानसभेसाठी भाजपच्या तयारीला सुरुवात; ‘त्या’ आमदारांना इशारा)
लोक आणि संस्कृती
पवई (powai) इथे वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे इथे आपल्याला शहराच्या सर्वात कॉस्मोपॉलिटन आणि आधुनिक संस्कृतीची झलक पाहायला मिळते.
पवई इथे कित्येक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे. त्यांपैकी कलियुग, गजनी, स्लमडॉग मिलेनियर, मर्दानी आणि हसीना मान जायेगी हे काही चित्रपट आहेत.
हिरानंदानी गार्डन्स
पवई हे हिरानंदानी गार्डन्स त्यांच्या निओक्लासिकल स्थापत्य शैलीसाठी देखील प्रसिद्ध आहे. या भागात उपनगरीय मुंबईतील काही उंच रेसिडेंशल इमारती बांधण्यात आल्या आहेत. उपनगर हे मुंबईतील प्रवासी लोकांसाठी आवडीचं निवासी क्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं.
इथे प्रवेश करण्यासाठी शेअरिंग सायकल राईड कंपनी युलूच्या निळ्या रंगाची सायकल सोयीस्कर ठरते. हिरानंदानी रेसिडेंशल कॉम्प्लेक्स इथे असलेले डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल हे या भागातलं पहिलं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. (powai mumbai maharashtra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community