प्रभादेवी हे मुंबईतील एक पॉश निवासी ठिकाण आहे, जे समुद्राजवळ वसलेलं आहे. इथे मुंबईचं प्रसिद्ध मंदिर सिद्धिविनायक मंदिर आहे आणि इथला परिसर देखील खूप सुंदर आहे. माहीम, दादर आणि वरळी पासून हा परिसर खूपच जवळ आहे. तसेच वांद्रे-वरळी सी-लिंक मार्गे वांद्र्यापर्यंत तुम्ही ड्राइव्ह करत जाऊ शकता. इथे समुद्रकिनारा, मॉल, पार्क किंवा रेस्टॉरंट अशा अनेक गोष्टी तुम्हाला आढळतील.
सुप्रसिद्ध शिवाजी पार्क देखील याच परिसरात आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक हे दिमाखात उभं आहे. मुंबईत वसलेला प्रभादेवी बीच हा पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक छान समुद्रकिनारा आहे. निसर्गरम्य दृश्यांमुळे आणि शहरातील विविध आकर्षणांमुळे हे एक लोकप्रिय पर्यटक ठिकाण झालं आहे. हा समुद्रकिनारा (बीच) प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ आहे आणि सुंदर वांद्रे-वरळी सी लिंक तुम्ही या बीचवरुन पाहू शकता. (Prabhadevi Beach)
(हेही वाचा – महिला वकिलाचा अश्लील व्हिडिओ बनवून वारंवार बलात्कार; Samajwadi Party च्या नेत्याच्या विरोधात तक्रार)
प्रभादेवी बीच कुठे आहे :
हे बीच प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराजवळ स्थित आहे, ज्यामुळे मंदिरात येणाऱ्या पर्यटक या बीचवर जाऊन आपला थकवा घालवतात आणि सन राईज व सन सेटचा आनंद घेतात.
निसर्गरम्य दृश्ये :
समुद्रकिनाऱ्यावरून, तुम्ही वांद्रे-वरळी सी लिंकचे सुंदर दृश्य पाहू शकता, वांद्रे-वरळी सी लिंक सूर्यास्ताच्या वेळी (सन सेट) खूपच सुंदर दिसते. (Prabhadevi Beach)
इथे काय करु शकाल? :
संध्याकाळच्या वेळी तुम्ही इथे फेरफटका मारु शकता किंवा सकाळी जॉगिंग करताना सूर्यनारायणाचे दर्शन घेऊ शकता. तसेच समुद्राजवळ विश्रांतीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. वाळू आणि लाटा अशा असे वातावरण मन प्रफुल्लित करते.
इथे कसे पोहोचाल? :
वांद्रे-वरळी सी लिंकद्वारे प्रभादेवी हे वांद्रे आणि वरळीसह मुंबईच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे बस, कास, टॅक्सी अशा कोणत्याही वाहनाने तुम्ही इथे सहज येऊ शकता.
काय पाहाल? :
सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, स्वा. सावरकरांचे राहते घर, चैत्य भूमी, वांद्रे-वरळी सी लिंक इ. (Prabhadevi Beach)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=LKLj2qLyv8k
Join Our WhatsApp Community