प्रतापगड किल्ला (pratapgad fort) हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या लोकप्रिय हिल स्टेशनजवळ स्थित एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. या किल्ल्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १६५९ मध्ये झालेल्या प्रतापगडाच्या लढाईसाठी हा किल्ला सर्वात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर सल्तनतचा सेनापती अफजल खानचा पराभव करुन वध केला होता.
किल्ला दोन भागात विभागलेला आहे : वरचा किल्ला, इथून सर्व हालचालींवर नजर ठेवली जात होती आणि खालचा किल्ला, जिथे अतिरिक्त संरक्षण सैन्य तैनात असायचं. पर्यटकांना किल्ल्याची प्रभावी वास्तुकला भुरळ घालते तसेच इथे भवानी मातेचं मंदिर देखील आहे. किल्ल्यावरून आजूबाजूच्या पश्चिम घाटाचे मनमोहक दृश्ये देखील दिसतात.
प्रतापगड किल्ला (pratapgad fort) हे एक आकर्षक ठिकाण आहे. इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचा हा साक्षीदार आहे. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून शिवरायांनी जगाला दाखवून दिलं होतं की आमच्या मायभूमीकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमचाही कोथळा बाहेर काढू. पराक्रम, शौर्य, त्याग, हिंदुत्व यांचा साक्षीदार म्हणजेच प्रतापगड!
(हेही वाचा – clay water pot : मातीच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने मिळतात अनेक फायदे! जाणून घ्या काय आहेत ते?)
भेट देण्याची सर्वोत्तम वेळ :
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यात थंडी असल्याने किल्ल्याला भेट देऊ शकता आणि निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊ शकता. पावसाळा सोडून इतर वेळीही इथे येऊ शकता.
प्रवासाचे पर्याय :
तुम्ही पुणे, मुंबई किंवा सातारा येथून रस्त्याने किल्ल्यावर (pratapgad fort) पोहोचू शकता. हा किल्ला महाबळेश्वरच्या जवळ आहे, म्हणून तुम्ही हिल स्टेशनच्या सहलीला आल्यावर देखील तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता.
प्रमुख आकर्षणे :
भवानी मंदिर, वरच्या किल्ल्यावरून दिसणारे सुंदर दृश्य.
विशेष बाब :
तुम्ही मराठा साम्राज्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकता, छान छान छायाचित्रे घेऊ शकता आणि पश्चिम घाटाच्या अद्भुततेचा आनंद घेऊ शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community