घर घेण्यासाठी अनेकांसमोर गृहकर्जाशिवाय पर्याय नसतो, पण गृहकर्जाचा हप्ताही मोठा आणि दीर्घकालीन असतो. त्यात मुद्दल व व्याज याचे मिश्रण असते. साधारणत: जेवढी मुद्दल असते, तेवढेच व्याज भरावे लागते. मात्र, त्यात निश्चितच बचत करणे शक्य आहे. हा बचतीचा मार्ग आहे प्री- पेमेंटचा. त्यातून गृहकर्जाचे हप्ते तुम्ही कमी करु शकता.
प्री पेमेंटचा पर्याय उपलब्ध
गृहकर्ज घेतानाच प्री- पेमेंटचा पर्याय उपलब्ध असतो. प्री- पेमेंटचा योग्य कालवाधी कोणता, हे जाणून घेणे यात आवश्यक आहे. गुंतवणूक सल्लागारांच्या मते बॅंका सुरुवातीच्या काळात व्याज वसूल करतात. त्यामुळे EMI चे ओझे हलके करण्यासाठी सुरुवातीच्या काळापासूनच Pre- Payment करणे आवश्यक आहे.
( हेही वाचा: मुलाखतीला जाताय? तुमच्या Resume मध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात )
काय आहे Pre- Payment ?
नियमित मासिक हप्त्यापेक्षा जास्त रक्कम स्वेच्छेने भरल्यास त्याला Pre- Payment असे म्हटले जाते. ही अधिकची रक्कम थेट मुद्दलात जमा होते. त्यामुळे मुद्दल कमी होऊन व्याजाची रक्कम घटत जाते. त्यामुळे तुमचे कर्जाचे हप्ते लवकर संपतात. यामुळे कर्जदाराची बचत होते.
Join Our WhatsApp Community