Tomato : पेट्रोलपेक्षाही टॉमेटो महाग; मुंबईत इतर भाज्यांचे काय आहेत नवे दर?

198

देशात टोमॅटोचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आता तर टोमॅटोच्या दराने पेट्रोललाही मागे टाकले आहे. दररोजच्या जेवणात वापरला जाणाऱ्या टॉमेटोने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत 1 किलो टॉमेटोसाठी 150 रुपये मोजावे लागत आहेत. यानुसार एका टॉमेटोची किंमत 16-17 रुपये इतकी आहे.

टॉमेटोचे दर किती वाढले?

गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोसाठी अधिक दर मोजावा लागत आहे. सुरुवातीला 1 किलोसाठी 100 रुपये मोजावे लागत होते. तर, आता दर वाढून 150 पर्यंत गेला आहे. तर, येत्या काही दिवसांत टॉमेटोचा भाव 200 रुपयांपर्यंत जाण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा मणिपूर हिंसाचार : १० जुलैपर्यंत इंटरनेट सेवा बंद)

120 रुपये किलो टॉमेटो

आकाराने लहान असलेली टॉमेटो, अर्धे कच्चे व पिवळ्या रंगाची टॉमेटोही 120 रुपये किलोने विकले जात आहेत. मंगळवारी बोरीवली, पवई, माटुंगा, ब्रीच कँडी, पेडर रोड, खार आणि वांद्रे पूर्व या भागात भाजीविक्रेते व दुकानात टॉमेटॉ 160 रुपये किलोने विकला जात होता.

भाज्यांचे दर कडाडले

टॉमेटोव्यतिरिक्त इतर भाज्यांचे दरदेखील वाढले आहेत. एक किलो फरसबीसाठी 120 ते 160 मोजावे लागत होते. मात्र आता एक किलो फरसबी 250 रुपयांना मिळत आहे. तर, एक लिंबू १२ ते १५ रुपयांना मिळत आहे. 1 किलो आल्यासाठी 250 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत. दर रोजच्या वापरासाठी आता भाजीविक्रेते कोथिंबीर आणि मिरचीही द्यायला काचकुच करत आहेत. 1 किलो हिरव्या मिरच्या 200 ते 300 रुपये दरानुसार विकल्या जात आहेत. तर कोथिंबीरीसाठी 200 ते 350 रुपये किलो भाव आहे. म्हणजेच एक जुडी कोथिंबर घेण्यासाठी 60 ते 100 रुपये मोजावे लागतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.