Priyadarshini Park : प्रियदर्शनी पार्कमध्ये जा आणि अशी करा धम्माल मस्ती!

45
Priyadarshini Park : प्रियदर्शनी पार्कमध्ये जा आणि अशी करा धम्माल मस्ती!
Priyadarshini Park : प्रियदर्शनी पार्कमध्ये जा आणि अशी करा धम्माल मस्ती!
प्रियदर्शनी पार्क विषयी माहिती

प्रियदर्शनी पार्क (Priyadarshini Park) आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे दक्षिण मुंबईत असलेलं एक स्वच्छ आणि सुस्थितीत असलेलं उद्यान आहे. प्रियदर्शनी पार्क हे समुद्राच्या समोरच आहे. त्यामुळे हे मुंबईतल्या प्रमुख आकर्षण केंद्रांपैकी एक आहे. हे पार्क मुंबईतल्या मलबार हिल्स नावाच्या अत्याधुनिक परिसरात वसलेलं आहे. या पार्कच्या आजूबाजूला कित्येक महागडे अपार्टमेंट्स आहेत. हे वीस एकर एवढ्या जमिनीवर पसरलेलं पार्क जणूकाही मुंबईचं पॉवरहाऊसच बनलं आहे. तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून हे प्रियदर्शनी पार्क (Priyadarshini Park) एक मनोरंजनाचं ठिकाण, तसंच क्रीडा आणि फिटनेस कॉम्प्लेक्स म्हणून आपली भूमिका बजावत आहे.

मुंबईतल्या रहिवाशांसाठी आश्रयस्थान असलेल्या या पार्कची जादू पाहण्यासाठी पहाटे या ठिकाणी भेट देऊ शकता. मुंबईकर पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात इथल्या समुद्राकडच्या टोकावर बसून आल्हाददायक लाटांच्या आवाजात आनंद लुटण्यासाठी इथे यायला कधीच विसरत नाहीत. एकेकाळी हा जमिनीचा तुकडा मलबारच्या समुद्रकिनाऱ्याचा फक्त एक खडकाळ भाग होता. पण आज या ठिकाणी एकूण ६०० पेक्षा जास्त नारळाच्या झाडांनी नटलेली एक सुंदर हिरवीगार बाग आहे. ही सुंदर हिरवीगार बाग म्हणजेच प्रियदर्शनी पार्क (Priyadarshini Park) होय.

(हेही वाचा – Fire : पनवेलमधील फार्मा कंपनीत भीषण आग; जीवित हानी नाही)

या पार्कमधलं परिपूर्ण आणि अनुकूल वातावरण लोकांना आकर्षित करतं. या पार्कमध्ये पहाटेपासून योग, जॉगिंग, चालणे, एरोबिक्स इत्यादी ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या असतात. याचं श्रेय प्रियदर्शनी पार्कच्या (Priyadarshini Park) सक्रिय समितीला जातं. ‘मलबार हिल सिटीझन फोरम’ या समितीद्वारे स्वतःच्या मुलाप्रमाणे या पार्कची काळजी घेण्यात येते.

तुम्हाला प्रियदर्शनी इथे होणाऱ्या मनोरंजन आणि क्रीडा उपक्रमांत सहभागी व्हायचं असेल तर, तुम्ही इथल्या समितीच्या अधिकाऱ्यांशी ते आयोजित करत असलेल्या मनोरंजन आणि क्रीडा उपक्रमांचे वार्षिक सदस्य होण्यासाठी संपर्क साधू शकता.

मुंबईचं प्रियदर्शनी पार्क (Priyadarshini Park) हे एक आदर्श कौटुंबिक सहलीचे ठिकाण आहे. त्याबरोबरच हे पार्क प्रेमीयुगुलांसाठी आणि तरुणांसाठी ही एक आदर्श ठिकाण आहे. या प्रियदर्शनी पार्कमध्ये तुम्हांला कितीतरी आल्हाददायी दृश्य पाहता येतील.

(हेही वाचा – Helicopter Crash: गुजरातच्या पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, 3 ठार)

प्रियदर्शनी पार्कमध्ये कसं पोहोचायचं

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रियदर्शनी पार्कपर्यंत जाण्याचे काही मार्ग येथे आहेत.

  • बस – तुम्ही ग्रँट रोड बस स्थानकावरून बसने नेपेन्सी रोड बस स्टॉपवर जाऊ शकता.
  • ट्रेन – तुम्ही ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला चर्चगेटकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढावं लागेल. नंतर ग्रँट रोड रेल्वे स्टेशनवर उतरा. मग तिथून प्रियदर्शनी पार्कला जाण्यासाठी तुम्ही बेस्ट सेवेचा किंवा भाड्याने घेतलेल्या कॅबचा पर्याय निवडू शकता.
  • भाड्याने घेतलेली कॅब किंवा सेल्फ-ड्राइव्ह – तुम्ही थोडा जास्त खर्च करून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रियदर्शनी पार्कला जाण्यासाठी भाड्याने घेतलेली कॅब राइड हा सर्वात सोयीचा मार्ग अवलंबू शकता.

टीप- जर तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत असाल, तर तुम्हाला कार पार्किंगच्या समस्यांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

प्रियदर्शनी पार्कला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

प्रियदर्शनी पार्कला (Priyadarshini Park) भेट देण्याचे नियोजन करत असाल तर पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ सर्वांत उत्तम आहे. कारण या काळात दिसणारी दृश्ये एरव्हीपेक्षाही जास्त आश्चर्यकारक आणि आल्हाददायक असतात. तसंच तुम्ही प्रियदर्शनी पार्कच्या (Priyadarshini Park) समुद्राकडच्या बाजूला बसून समुद्राचं सुंदर दृश्य पाहू शकता आणि समुद्राचा गाझ ऐकू शकता.

शांत समुद्राचा गाझ ऐकताना तुमचे सर्व वैयक्तिक ताण नक्कीच दूर होतील. शक्य असल्यास इथे सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच या.

(हेही वाचा – लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले)

इतर आवश्यक माहिती
  • स्थान – प्रियदर्शनी पार्क हे मलबार हिल, मुंबई येथे एल. जगमोहनदास मार्गावर आहे.
  • वेळ – हे पार्क सकाळी ५ वाजता उघडते आणि रात्री ९ वाजता बंद होते. तुम्ही प्रियदर्शनी पार्कला फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्याचा विचार करत असाल, तर ते पूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी २ तास पुरेसे आहेत.
  • प्रवेश शुल्क – प्रियदर्शनी पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. तरी तुम्हाला प्रियदर्शनी पार्कमधल्या कोणत्याही मनोरंजन किंवा क्रीडा विषयक कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही मलबार हिल सिटीझन ग्रुपशी संपर्क साधू शकता.

या पार्कमधील प्रत्येक करमणूकीमध्ये सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क लागू करण्यात येतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.