साध्या फोनमध्येही काढता येतात प्रोफेशनल फोटो! या टिप्स फॉलो करा

अलिकडे प्रत्येकजण बाहेर फिरायला गेल्यावर किंवा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण कॅमेरामध्ये टिपतात. फोटो चांगले यावेत यासाठी चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु चांगले फोटो काढण्यासाठी तुमच्याकडे महागडा स्मार्टफोन असायला हवा हा समज चुकीचा आहे. तुम्ही स्वस्त व जास्त मेगापिक्सल (Megapixel)असलेल्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा अप्रतिम फोटो काढू शकता. सध्या मार्केटमध्ये ६४, १०८ मेगापिक्सल कॅमेरे असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या काही टिप्स फॉलो करून तुम्ही स्वस्त मस्त फोनमध्ये सुद्धा सुंदर फोटो काढू शकता.

( हेही वाचा : अशीही नोकरी… काहीही न सांगता 90 दिवस निवांत घरी बसूनही मिळतो पगार! )

चांगले फोटो काढण्यासाठी काही टिप्स 

  • फोटोग्राफीसाठी कॅमेरा लेंस सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या कॅमेरा लेंसवर स्क्रॅच किंवा तडा गेल्यास चांगले फोटो काढणे शक्य होणार नाही. चांगले फोटो येण्यासाठी कॅमेरा लेंस स्वच्छ असणे गरजेचे असते त्यामुळे लेंस खराब होईल अशा ठिकाणी तुमचा फोन ठेऊ नका.
  • चांगल्या फोटोसाठी ग्रिड लाइनचा उपयोग करा. ग्रिड लाइनचा वापर करून फोटो काढल्यास चांगले फोटो येण्यास मदत होईल.
  • नैसर्गिक प्रकाशात फोटो सुंदर येतात. रात्री फोटो काढताना सुद्धा चांगला प्रकाश असेल त्याठिकाणी फोटो काढावेत जेणेकरून तुमचे फोटो आकर्षक येतील.
  • स्वस्त फोनमध्ये सुद्धा HDR सुविधा उपलब्ध असते त्यामुळे या एचडीआर मोडमध्ये तुम्ही चांगले फोटो क्लिक करू शकता. HDR ( High dynamic range) मोडमध्ये कॅमेरा हाय-कॉन्ट्रॅस्टमध्ये चांगला फोटो काढण्यास मदत होते.
  • अलिकडे प्रत्येक फोनमध्ये पोट्रेट मोड असतो. त्यामुळे DSLR सारखे फोटो क्लित करता येतात. पोट्रेट मोडमध्ये संबंधित व्यक्तीवर फोकस करून आजूबाजूचा परिसर ब्लर करता येतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here