Promenade Beach कुठे आहे आणि तिथे गेल्यावर काय मज्जा कराल?

27
Promenade Beach कुठे आहे आणि तिथे गेल्यावर काय मज्जा कराल?

पॉंडिचेरी इथल्या सर्व समुद्र किनाऱ्यांपैकी Promenade Beach हा एक अतिशय सुंदर समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यावर निळसर रंगाचं पाणी पाहायला मिळतं. या किनाऱ्यावर येणाऱ्या समुद्राच्या लाटा पाण्याच्या फवारण्या कराव्यात अशा असतात. या समुद्र किनाऱ्यावरची चमकणारी वाळू, सुंदर समुद्र किनारपट्टी आणि इथलं आरामदायी वातावरण या सर्व गोष्टींसाठी प्रोमेनेड बीच हा प्रसिद्ध आहे. (Promenade Beach)

पॉंडिचेरी बीच, रॉक बीच आणि गांधी बीच म्हणूनही हा प्रोमेनेड बीच ओळखला जातो. या बीचवर सर्व वयोगटातले पर्यटक आनंददायी वातावरणात आपला चांगला वेळ घालवण्यासाठी आणि रिफ्रेश होण्यासाठी इथे येतात. फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी, निसर्गप्रेमींसाठी आणि भटकंती करणाऱ्यांसाठी हा प्रोमेनेड बीच म्हणजे एक आदर्श ठिकाण आहे. या समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अतिशय मनमोहक रंगछटा पाहायला मिळतात. हा प्रोमेनेड बीच म्हणजे पॉंडिचेरी टूरचा अविभाज्य भाग आहे. (Promenade Beach)

प्रोमेनेड बीच हा शहराच्या मध्यभागी आहे. या बीचवर येणारे पर्यटक स्वतःसाठी आयुष्यभर लक्षात राहतील अशा चांगल्या आठवणी इथून आपल्यासोबत घेऊन जातात. येथे येणाऱ्या पर्यटकांना सूर्याच्या उबदार प्रकाशात आपलं मन तणावमुक्त झाल्यासारखं वाटतं. पर्यटक इथल्या थंडगार पाण्यात उडी मारून ताजेतवाने होतात, इथल्या मऊशार वाळूमध्ये फेरफटका मारतात आणि खेळतात. या समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या इतर अनेक पर्यटनस्थळांना तुम्ही भेट देऊ शकता. (Promenade Beach)

(हेही वाचा – Guardian Minister : एकनाथ शिंदे यांचा फडणवीसांना फोन… पालकमंत्रिपदाच्या स्थगितीची इनसाईड स्टोरी)

पॉंडिचेरी इथल्या प्रोमेनेड बीचवर करण्यासारख्या गोष्टी

तुम्ही विश्रांतीच्या शोधात असाल किंवा साहसी ऍडव्हेंचरच्या शोधात असाल तर प्रोमेनेड बीचवर तुम्हाला नेहमीच स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी नक्कीच सापडतील. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत…

  • आपल्या प्रियजनांसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी आणि आयुष्यभरासाठी सुंदर आठवणी तयार करण्यासाठी, या १.५ किलोमीटर एवढ्या लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर तुमच्या जोडीदारासोबत हातात हात घालून चालत फिरू शकता.
  • तोंडाला पाणी आणणारी कॉफी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टी सीफूड डिशेसचा आनंद घेण्यासाठी इथल्या लोकप्रिय ‘ले कॅफे’ रेस्टॉरंटला भेट द्या. या समुद्र किनाऱ्यावर इतर अनेक रेस्टॉरंट्स देखील आहेत जिथे तुम्ही इथल्या पारंपारिक अन्नाचा आस्वाद घेऊ शकता. (Promenade Beach)
  • या समुद्र किनाऱ्यावर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणाऱ्या इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश आहे. त्यांमध्ये जुना हेरिटेज टाउनहॉल, डुप्लेक्सचा पुतळा, जुनं लाईट हाऊस, युद्ध स्मारक इत्यादींचा समावेश आहे. या ऐतिहासिक वास्तूंबद्दल सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शक देखील नियुक्त करू शकता.
  • या बीचवर करण्यासारख्या इतर ऍक्टिव्हिटिंमध्ये व्हॉलीबॉल, जॉगिंग, स्केटिंग, योगा आणि पोहणे यांचाही समावेश आहे. इथल्या समुद्र किनाऱ्यावरील स्थानिक विक्रेत्यांकडून हस्तकलेच्या वस्तू खरेदी करू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.