प्रपोज डे हा व्हॅलेंटाईन वीकचा एक भाग आहे, जो भारतासह अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी ८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीला किंवा जिच्याबद्दल त्यांना भावना आहेत अशा व्यक्तीला प्रपोज करून त्यांचे प्रेम व्यक्त करतात. प्रपोज हे शब्दांद्वारे, भेटवस्तूंच्या माध्यमातून, फुलांच्या स्वरूपात किंवा अगदी त्या क्षणाला खास बनवण्यासाठी सरप्राईज देऊन साजरा केला जाऊ शकतो. (propose day quotes)
या दिवशी नातेसंबंधांमध्ये एक पाऊल पुढे टाकले जाते आणि भावना उघडपणे व्यक्त करुन आपल्या मनातील भाव सांगितला जातो. त्यामुळे प्रपोज डे या प्रेमी युगुलांसाठी अत्यंत खास दिवस आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या Partner इम्प्रेस करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी propose day quotes घेऊन आलो आहोत. (propose day quotes)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : राज्यसेवेतील अधिकाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसाठी महासंघाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले)
१.
प्रेमाचा अर्थ तू मला समजवून सांगितलास.
जीवनाचा अर्थ तू उमलून सांगितलास.
आता माझ्या प्रेमाचा स्वीकार कर राणी…
Happy propose day
२.
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेमात होकार दे ना
किती करशील नखरे अगं?
कायमची माझी हो ना
३.
तुझी झलक पाहण्यासाठी
चंद्र सुद्धा जागा असतो
रात्रभर तुझ्या घरात
आभाळातून डोकावत असतो
४.
जे आजपर्यंत बोलता आले नाही,
ते मी तुला सांगणार आहे काही
तुझ्याशिवाय आहे जीवन व्यर्थ
तू हो म्हणशील तर येईल अर्थ
Happy Propose Day !
५.
होकार द्यायचा की नाही, हा निर्णय तुझा
पण तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार माझा
Happy Propose Day ! (propose day quotes)
(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd ODI : शतकवीर शुभमन गिलच्या नावावर लागले एकदिवसीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे विक्रम )
६.
एक Promise मी देतो,
एक Promise तू दे.
Promise ची ही देवाणदेघाण
होईल बघ आपला संसार छान
७.
हातात तुझा हात
हवी तुझीच साथ
अजून काय हवे?
तुझ्या प्रेमाची आस
८.
ढगांचं आभाळाशी…
मातीचं जमिनीशी..
असंच अतुट नातं
माझं तुझ्याशी…
९.
माझं आडनाव तुला कसं वाटतं?
आता तेच आडनाव
तुझ्या नावामागे लावून बघ.
आता परत सांग,
माझं आडनाव तुला कसं वाटतं?
Happy Propose Day
१०.
मी तुला पहिल्यांदा भेटले
त्या दिवसापासून
तू माझा Soulmate झालास
माझ्या आयुष्या आलास आणि
माझं आयुष्यच झालास…
Happy Propose Day My Love! (propose day quotes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community