-
ऋजुता लुकतुके
तेलुगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनच्या मालमत्तेकडे पाहिलं की लक्षात येतं, तो अभिनेता असण्याबरोबरच चांगला उद्योजकही आहे. वयाच्या ४२ व्या वर्षीच अर्जुन ४६० कोटी रुपयांचा धनी आहे. आणि हे पैसे फक्त अभिनयातून येत नाहीत तर त्याने केलेल्या चांगल्या गुंतवणुकीतून येतात. तेलुगू चित्रपट सृष्टीतील तो आघाडीचा नायक आहे. पुष्पा २ साठी अर्जुनने तब्बल ३०० कोटी रुपये घेतल्याचं बोललं जातं. हा एक विक्रम आहे. आणि त्याने विजय या तेलुगू सहकाऱ्याला याबाबतीत मागे टाकलं आहे. याशिवाय त्याची स्वत:ची निर्मिती संस्था, एक मल्टीप्लेक्स आणि इतरही व्यवसाय आहेत. (Allu Arjun Net Worth)
शिवाय त्याच्या नावाची एक रेस्टॉरंट चेन आहे. एका औषध कंपनीतही त्याने गुंतवणूक केली आहे. शिवाय सोशल मीडिया प्रमोशनसाठीही तो दणकून पैसे घेतो. पुष्पाच्या पहिल्या भागाने जगभरात ३६० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर पुष्पा २ ची उत्सुकता लोकांना होतीच. पहिल्या आठवड्यातच आतापर्यंत चित्रपटाने ५०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. आणि या चित्रपटासाठी अर्जुनने कमाईचे सगळे उच्चांक मोडत तब्बल ३०० कोटी रुपये घेतल्याचं बोललं जात आहे. (Allu Arjun Net Worth)
(हेही वाचा – Veer Savarkar यांची प्रतिमा हटवण्याची भाषा करणाऱ्या कर्नाटक सरकारचा CM Devendra Fadnavis यांनी केला निषेध)
अल्लू अर्जुनच्या हैद्राबादमधील घराची किंमत १०० कोटी रुपये इतकी आहे. शिवाय त्याचे आणखीही काही ठिकाणी व्हिला आहेत. त्याच्या मालकीचे खाजगी जेट आहे. आणि गाड्यांचा ताफाही भला मोठा आहे. अल्लू अर्जुनचे इन्स्टाग्रामवर २५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यावर केलेल्या प्रमोशनल पोस्टसाठी तो पैसे घेतो. तसंच फ्रूटी, केएफसी, रॅपिडो, हीर मोटो-कॉर्प, रेडबस आणि डिस्नी हॉटस्टार अशा कंपन्यांच्या जाहिराती तो करतो. प्रत्येक जाहिरातीसाठी तो ६ ते ७ कोटी रुपये घेतो. (Allu Arjun Net Worth)
मनोरंजन क्षेत्राशिवाय अल्लू अर्जुनने वाईल्ड बफेलो विंग्ज या अमेरिकन स्पोर्ट्स बारची फ्रँचाईजी हैद्राबादमध्ये सुरू केली आहे. तर एका औषध कंपनीतही त्याची मोठी गुंतवणूक आहे. अल्लूच्या कुटुंबाने अल्लू स्टुडिओ नावाने एक मनोरंजन क्षेत्रातील कंपनी आधीच सुरू केली होती. आता गीता आर्ट्स नावाने एक निर्मिती आणि वितरण संस्थाही त्याने सुरू केली आहे. तर तर अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी आहा नावाने तामिळ आणि तेलुगू ओटीटी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मही सुरू केला आहे, ज्यात अर्जुनची मोठी गुंतवणूक आहे. त्याच्या औषध कंपनीचं नाव कॉलहेल्थ सर्व्हिसेस असं आहे. ही सगळी गुंतवणूक मिळून अल्लू अर्जुनची मालमत्ता ४६० कोटी रुपयांच्या घरात जाते. (Allu Arjun Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community