Radhika Merchant Net Worth : अंबानी कुटुंबाची नवीन सून राधिका मर्चंट आहे ‘इतक्या’ कोटींची धनी

Radhika Merchant Net Worth : राधिका ही एनकोअर हेल्थकेअर कंपनीचे मालक विरेन मर्चंट यांची मुलगी आहे.

24
Radhika Merchant Net Worth : अंबानी कुटुंबाची नवीन सून राधिका मर्चंट आहे ‘इतक्या’ कोटींची धनी
  • ऋजुता लुकतुके

मुकेश अंबानी यांचा सगळ्यात धाकटा मुलगा अनंत अंबानी सध्या गुजरातमध्ये त्यांनी उभारलेल्या वनतारा प्रकल्पामुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचं अलीकडेच उद्घाटन झालं आहे. अनंत अंबानीचं गेल्यावर्षी जुलै महिन्यात उद्योजक विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी विवाह झाला आहे. मुंबईत १२ जुलैला हा सोहळा पार पडला. जगभरातील प्रसिद्ध राजकीय नेते, उद्योजक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सोहळ्याला उपस्थित होते. मुकेश अंबानी त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज या घडीला भारतातील आणि आशियातील सगळ्यात मोठा उद्योग समुह आहे. त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. पण, या लेखात आपण अंबानी कुटुंबाशी सोयरिक जुळलेल्या मर्चंट कुटुंबीयांविषयी जाणून घेणार आहोत. (Radhika Merchant Net Worth)

(हेही वाचा – Reliance Power Anil Ambani : मुकेश अंबानींचे धाकटे भाऊ अनिल सध्या कुठे राहतात?)

विरेन मर्चंट हे राधिकाचे वडील एनकोअर हेल्थकेअर ही भारतातील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी चालवतात. ते एनकोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर पत्नी शैलाही विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहे. विरेन यांची एकूण संपत्ती ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. खुद्द राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि इस्प्रवा समुहाबरोबर ती सध्या कार्यरत आहे. ही कंपनी गोवा आणि निलगिरी पर्वताच्या परिसरात प्रिमिअम रिअल इस्टेट प्रकल्प उभारण्याचं काम करते. (Radhika Merchant Net Worth)

(हेही वाचा – “कामात दिरंगाई आढळल्यास…” ; Raj Thackeray यांची पदाधिकाऱ्यांना थेट तंबी)

राधिकाची मोठी बहीण अंजलीही इस्प्रावा समुहात काम करते आणि त्याचबरोबर एनकोअर हेल्थकेअरमध्येही ती महत्त्वाच्या भूमिका पार पाडताना दिसते. विरेन मर्चंट यांनी सूत्र हातात घेतल्यापासून एनकोअर हेल्थकेअरने चांगली प्रगती केली आहे. आणि ही कंपनी आता ७५० कोटी रुपयांची झाली आहे. तसंच त्यांची पत्नी शैला मर्चंटही १० कोटींच्या धनी आहेत. राधिकाची वैयक्तिक संपत्ती या घडीला १० कोटी रुपयांच्या आसपास असेल असा अंदाज आहे आणि कमाई एनकोअर हेल्थकेअर तसंच विविध कंपन्यांच्या संचालक मंडळात ती करत असलेल्या कामातून होते. (Radhika Merchant Net Worth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.