Raigad Fort : रायगड किल्ल्याबद्दल या विशेष बाबी तुम्हाला माहित आहेत का?

57
Raigad Fort : रायगड किल्ल्याबद्दल या विशेष बाबी तुम्हाला माहित आहेत का?
Raigad Fort : रायगड किल्ल्याबद्दल या विशेष बाबी तुम्हाला माहित आहेत का?

रायगड जिल्ह्यात (Raigad Fort) असलेल्या महाडपासून २५ किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेला रायगड हा एक डोंगरी किल्ला आहे. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून आपली राजधानी स्थापित केली. सध्या रायगड किल्ल्यावर (Raigad Fort) पोहोचण्यासाठी रोप वेची सुविधा उपलब्ध आहे.

किल्ल्यावर एक कृत्रिम तलावही आहे. त्या तलावाला ‘गंगा सागर तलाव’ म्हणून ओळखलं जातं. या किल्ल्यावर जाण्याचा एकमेव मुख्य मार्ग “महादरवाजा” मधून जातो. रायगड किल्ल्याच्या आत असलेल्या दरबारात मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे. दरबाराला जो मुख्य दरवाजा आहे त्याला नगारखाना दरवाजा म्हणतात. दरवाजापासून सिंहासनापर्यंत ऐकू जावे यासाठी दरबाराची विशिष्ट बांधणी करण्यात आली होती. तसंच रायगड किल्ल्याला “हिरकणी बुरुज” नावाचा एक प्रसिद्ध बुरुज आहे. जो एका मोठ्या उंच खडकावर बांधण्यात आला आहे.

(हेही वाचा – चीनमध्ये Metapneumovirus चे थैमान; नव्या वर्षात कोविड-१९च्या आठवणींनी भीतीचे वातावरण)

रायगड किल्ल्यावरून (Raigad Fort) टकमक टोक दिसते. या टकमक टोकावरून शिक्षा झालेल्या कैद्यांना मृत्युदंड दिला जात असे. या भागाला आता कुंपण घालण्यात आलं आहे.

जगदीश्वर मंदिराकडे (Jagadishwar Temple) जाणाऱ्या मुख्य बाजारपेठेच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ही मूर्ती उंचावर असून तिच्या पहिल्या पायरीवर सरदार हिरोजी इंदलकर यांचं नाव कोरलं आहे. तसंच महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधीदेखील आहे. राजमाता जिजाबाई यांची समाधी पाचाडच्या पायथ्याशी गावात आहे.

किल्ल्याच्या इतर आकर्षणांमध्ये खुबलाधा बुरुज, नाने दरवाजा आणि हत्ती तलाव यांचा समावेश आहे. इथे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा वाघ्याची मूर्ती जुलै २०१२ साली संभाजी ब्रिगेडच्या कथित सदस्यांनी हटवली होती. पण शिवाजी रायगड स्मारक समिती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, शिल्पकार रामभाऊ पारखी आणि जिल्हा प्रशासन यांनी वाघ्याची मूर्ती पुन्हा स्थापित केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.