IRCTC New Plan : स्वस्त मस्त रेल्वे! आता जेवणासाठी नका देऊ जास्तीचे पैसे, पहा संपूर्ण दरपत्रक

रेल्वेजाळे संपूर्ण भारतात विस्तारलेले असल्यामुळे लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. लांबचा रेल्वे प्रवास करताना, आपण हमखास जेवण ऑर्डर करतो. आता तुम्हाला रेल्वेमध्ये खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. यासाठी IRCTC कडून खाद्यपदार्थांचा मेन्यू आणि त्यांची किंमत अशी यादी जारी करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला रेल्वे प्रवासादरम्यान आधीच खाद्यपदार्थांची किंमत समजेल.

( हेही वाचा : Confrim तिकीट नाहीये? आता ट्रेनमध्ये प्रवास करताना मिळेल हक्काची जागा)

प्रवाशांची गैरसोय दूर

IRCTC ने आधीच दरपत्रक जाहीर केल्याने रेल्वे पेंट्रीमधील लोक तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीसाठी जास्त शुल्क घेऊ शकणार नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान IRCTC प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करते मात्र, अनेकवेळा जेवणासाठी जास्त किंमती आकारल्या जातात याबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी IRCTC ने आपला मेन्यू आणि दरपत्रक जारी केले आहेत. प्रवासी जेवण ऑर्डर करताना Online पेमेंट सुद्धा करू शकतात अशी माहिती IRCTC ने दिली आहे.

व्हेज जेवण दरपत्रक

 • व्हेज जेवण स्टेशनवर – ७० रुपये.
 • ट्रेनमध्ये व्हेज जेवण – ८० रुपये.
  (या थाळीमध्ये भात, चपाती किंवा पराठा, डाळ किंवा सांबार, व्हेज भाजी, दही आणि लोणचे मिळेल.)

पुरी आणि बटाटा भाजी

 • स्टेशनवर – १५ रुपये.
 • ट्रेनमध्ये – २० रुपये.

व्हेज बिर्याणी

 • स्टेशनवर – ७० रुपये.
 • ट्रेनमध्ये – ८० रुपये.

नॉनव्हेज जेवण

 • स्टेशनवर – ८० रुपये.
 • ट्रेनमध्ये – ९० रुपये.
  (या थाळीमध्ये अंडा करी राइस, पराठा किंवा चपाती, दही आणि लोणचे)

चिकन नॉनव्हेज थाली

 • स्टेशनवर – १२० रुपये.
 • ट्रेनमध्ये – १३० रुपये.
  (या थाळीमध्ये साधा भात, पराठा किंवा चपाती, चिकन करी, दही आणि लोणचे)

अंडा बिर्याणी

 • स्टेशनवर – ८० रुपये.
 • ट्रेनमध्ये – ९० रुपये.

चिकन बिर्याणी

 • स्टेशनवर – १०० रुपये.
 • ट्रेनमध्ये – ११० रुपये.

IRCTC ने अपडेट केले दरपत्रक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here