पावसात सर्वाधिक टेन्शन असते ते स्मार्टफोनचे. पावसात फोन सुरक्षित ठेवणे हे एक आव्हानच असते. पावसात भिजल्याने तुमचाही फोन खराब झाला असेल, तर तुम्हाला या टिप्स फायदेशीर ठरतील, या टीप्स वापरुन तुम्ही सहज तुमचा फोन वापरात आणू शकता.
जर तुमचा स्मार्टफोन (Smartphone) पाण्यात भिजला तर तो लगेच बंद करा. फोनमध्ये पाणी गेल्यास शाॅर्टसर्किटही होऊ शकते. कायम लक्षात असुद्या की फोनची टेस्टिंग करण्याचा अजिबात प्रयत्न करु नका. तसेच, कोणतेही बटण दाबून तपासू नका. सर्वात आधी मोबाईल बंद करणे हेच योग्य आहे.
बॅटरी काढा
जर फोन पाण्यात किंवा पावसात भिजला असेल, तर मोबाइलची बॅटरी काढून टाका. यामुळे फोनची पावर खंडित होईल. तुमच्या फोनमध्ये न काढता येणारी बॅटरी असेल तर तुम्ही तुमचा मोबाइल थेट बंद करा.
( हेही वाचा: ५ वर्षांखालील मुलांना ‘ही’ लस द्या; बालरोगतज्ज्ञांचा सल्ला )
हेडफोन आणि यूएसबी वापरु नका
जर फोन ओला असेल तर त्यामध्ये हेडफोन आणि यूएसबी अजिबात कनेक्ट करु नका. यामुळे तुमचा फोन आणखी खराब होऊ शकतो.
वाॅटरप्रुफ पाउच सोबत ठेवा
मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही वाॅटरप्रुफ पाउच सोबत ठेवू शकता. तु्म्हाला ते कोणत्याही ऑनलाइन साइटवर मिळेल. त्याची किंमत देखील फक्त 99 रुपये आहे. थोडेसे पैसे खर्च करुन तुम्ही तुमचा हजारो रुपयांचा फोन वाचवू शकता.
ब्लूटूथ हेडफोन
तुम्हाला पावसात कुठेतरी महत्त्वाच्या ठिकाणी जायचे असेल आणि मोबाइलची गरज असेल तर तुम्ही ब्लुटूथ हेडफोन वापरु शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा फोन फाॅइल किंवा जाड कापडाच्यामध्ये अडकवू शकता आणि खिशात सुरक्षित ठेवू शकता.