Rajabai Clock Tower : मुंबईतील फोर्ट इथल्या राजाभाई टॉवरचं काय आहे वैशिष्ट्य?

85
Rajabai Clock Tower : मुंबईतील फोर्ट इथल्या राजाभाई टॉवरचं काय आहे वैशिष्ट्य?

राजाबाई टॉवर हा मुंबईत असलेला एक क्लॉक टॉवर आहे. हा टॉवर फोर्ट इथल्या मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आहे. या टॉवरची उंची ८५ मीटर म्हणजेच २८० फूट इतकी आहे. ही उंची २५ मजली इमारतीच्या उंची इतकी आहे. हा टॉवर भारतावरच्या ब्रिटिश राजवटीतला व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बलचा एक भाग आहे. राजाबाई टॉवर हा २०१८ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता. (Rajabai Clock Tower)

(हेही वाचा – Thackeray group Banner: काय आहे हिंदुत्व? ठाण्यात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी)

क्लॉक टॉवरला राजाबाई हे नाव कसं पडलं?

राजाबाई क्लॉक टॉवरची रचना सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट नावाच्या ब्रिटिश आर्किटेक्टने केली होती. त्याने लंडन इथल्या बिग बेनच्या डिझाईन सारखं मॉडेल तयार केलं. १ मार्च १८६९ साली पायाभरणी करण्यात आली होती. १८७८ साली नोव्हेंबरच्या महिन्यात या क्लॉक टॉवरचं बांधकाम पूर्ण झालं होतं. या टॉवरच्या बांधकामाचा एकूण खर्च त्या वेळी रु. ५५०,००० इतका आला होता. त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती.

बांधकामासाठी लागलेल्या एकूण खर्चाचा एक भाग मुंबईतल्या प्रेमचंद रॉयचंद जैन नावाच्या श्रीमंत दलालांनी दान केला होता. त्यावेळी त्यांनी त्या उभारण्यात येणाऱ्या क्लॉक टॉवरला त्यांच्या आईचं म्हणजेच राजाबाई यांचं नाव देण्यात यावं या एका अटीवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना केली होती.

प्रेमचंद रॉयचंद यांच्या आई अंध होत्या. त्या जैन धर्माच्या कट्टर अनुयायी होत्या. म्हणून त्या सूर्यास्ताच्या आधी रात्रीचं जेवण घ्यायच्या. असं म्हटलं जातं की, क्लॉक टॉवरच्या संध्याकाळच्या घंटेमुळे त्यांना इतर कोणाचीही मदत न घेता आपल्या जेवणाची वेळ झाली हे कळू लागलं होतं.

पण जेव्हा लोक वरचेवर या क्लॉक टॉवरवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने यायला लागले तेव्हा हा क्लॉक टॉवर सामान्य जनतेच्या प्रवेशासाठी बंद करण्यात आला होता. (Rajabai Clock Tower)

(हेही वाचा – grand island : गोव्यामध्ये ग्रॅंड आयलॅंड कुठे आहे? आणि तिथे तुम्ही काय काय धम्माल करु शकता?)

राजाबाई क्लॉक टॉवरची रचना कशी आहे?

राजाबाई क्लॉक टॉवरच्या रचनेमध्ये व्हेनेशियन आणि गॉथिक शैलीचं मिश्रण दिसतं. हे टॉवर कुर्ला इथल्या खाणींमधून मिळणाऱ्या बफ रंगाच्या दगडांपासून बांधण्यात आलं आहे. या टॉवरला शहरातील सर्वोत्कृष्ट काचेच्या खिडक्या आहेत.

टॉवरच्या तळमजल्यावर दोन बाजूंना खोल्या आहेत. प्रत्येक खोली ५६ फूट × २७.५ फूट एवढी आहे. या टॉवरमध्ये २६ स्क्वेअर फूटचा कॅरेज पोर्च आणि २८ स्क्वेअर फुटाचं सर्पिल आकाराचं स्टेअरकेस व्हेस्टिब्युल आहे. राजाबाई क्लॉक टॉवरची इमारत २८० फुटांची आहे. त्या काळात राजाबाई क्लॉक टॉवर ही मुंबई शहरातली सर्वात उंच इमारत होती.

राजाबाई क्लॉक टॉवरची धून

१९व्या शतकामध्ये या क्लॉक टॉवरवर “होम! स्वीट होम!” ची ट्यून वाजवली गेली. याव्यतिरिक्त टॉवरच्या एकूण सोळा ट्युन्सपैकी एक असलेली “अ हँडल सिम्फनी” ही सुद्धा एक ट्यून होती. टॉवरच्या ट्युन्स दिवसातून चार वेळा बदलायच्या. पण सध्या दर १५ मिनिटांनी एकच ट्यून वाजते. (Rajabai Clock Tower)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.