
राजमाची ट्रेक हा लोणावळा आणि कर्जत या दोन लोकप्रिय हिल स्टेशन्सच्या मध्यभागी आहे. लोणावळ्याहून किंवा कर्जतहून या ट्रेकवर जाता येतं. ट्रेकर्सना उधेवाडी नावाच्या पायथ्याशी असलेल्या गावापासून सुरू होणारे दोन किल्ले चढण्याची संधी मिळते. त्यातला एक म्हणजे मनरंजन किल्ला आणि दुसरा म्हणजे श्रीवर्धन किल्ला होय. (Rajmachi Fort)
मनरंजन किल्ल्याची उंची २५१० फूट एवढी असून त्याचं तोंड पश्चिम दिशेला आहे. तर श्रीवर्धन किल्ल्याची उंची २७१० फूट एवढी असून त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे. या भागात येणाऱ्या ट्रेकर्सना संध्याकाळी उशिरा असंख्य काजवे चमकताना दिसतात. जर तुम्ही लोणावळ्याच्या मार्गाने ट्रेकिंग करत असाल, तर हा ट्रेक खूप लांब आहे. पण दोन्ही किल्ल्यांवर पोहोचणं सोपं आहे. उधेवाडीला पोहोचेपर्यंत बहुतेक जंगलाच्या बाजूने पायथ्याशी ट्रेकिंग करावं लागेल. कंडाळा मार्ग खोंडाणे इथल्या गुहा आणि धबधब्यांपासून सुरू होतो. या ठिकाणी जंगलाच्या भागातून तीव्र चढाई आहे. (Rajmachi Fort)
हे किल्ले सातवाहनांनी बांधले होते. पण १५ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले स्वराज्याच्या ताब्यात घेतले तेव्हा त्यांना प्रसिद्धी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक इमारती जोडल्या आणि किल्ल्यांचा विस्तार केला. या किल्ल्यांमध्ये मराठे आणि मुघल यांच्यात अनेक लढाया झाल्या आहेत. त्यानंतर १९व्या शतकामध्ये हे किल्ले ब्रिटिशांनी ताब्यात घेतले होते. राजमाची हा सध्याच्या मुंबई आणि पुणे शहरांना जोडणारा एक लोकप्रिय व्यापारी मार्ग देखील होता. (Rajmachi Fort)
(हेही वाचा – मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवेल, सकाळचा भोंगा नाही; Chandrashekhar Bawankule यांचा राऊतांना टोला)
राजमाची ट्रेक किती लांब आहे?
कोंडीवाडे गावापासून राजमाची ट्रेक १३ किलोमीटर एवढा लांब आहे. तर उधेवाडी या गावाच्या बाजूने हा ट्रेक सुमारे ३.५ किलोमीटर एवढा लांब आहे. जरी हा थोडा लांब ट्रेक असला तरी त्याची चढाई तितकी कठीण नाही. तसंच वरच्या बाजूला पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत त्यामुळे एकूण अंतर वाढतं. (Rajmachi Fort)
ट्रेकची माहिती
- या ट्रेकचा पाया महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात असलेल्या उधेवाडी नावाच्या गावापासून सुरू होतो.
- उधेवाडीला जाण्यासाठी तुम्ही दोन मार्गांनी ट्रेक करू शकता. त्या दोन्ही मार्गांचं स्वतंत्र वेगळं आकर्षण आहे.
- लोणावळा ते उधेवाडी ट्रेक किंवा कर्जत ते उधेवाडी ट्रेक असे दोन मार्ग तुम्ही निवडू शकता.
(हेही वाचा – IPL 2025 : ‘बॅट विरुद्ध बॉल द्वंद्वांत गोलंदाजांनाही समान संधी हवी’; शार्दूल ठाकूरने व्यक्त केली अपेक्षा)
उधेवाडी पासून राजमाची ट्रेक हा तीन भागात विभागला जाऊ शकतो. ते म्हणजे…
- उधेवाडी गाव ते भैरवनाथ मंदिर
- मनरंजन किल्ल्यापर्यंत चढून भैरवनाथ मंदिरापर्यंत उतरणं
- श्रीवर्धन किल्ला चढून पुन्हा पायथ्याशी उतरणं
(हेही वाचा – Parvati Hill Temple : पेशव्यांनी बांधलेल्या पार्वती हिल्स मंदिरात कधी दर्शनाला गेला आहात?)
कर्जत आणि खंडाळ्याच्या जंगलातुन ट्रेक करताना समृद्ध वनस्पती आणि प्राण्यांचा अनुभव
कर्जत आणि खंडाळ्याच्या जंगलांतून जाणारा हा ट्रेकचा मार्ग समृद्ध वनस्पती आणि जंगली प्राण्यांनी भरलेला आहे. या जंगलांमध्ये अनेक पक्षी, सरडे आणि कीटकांची घरं आहेत. तसंच या वनपट्ट्यामध्ये बिबट्या दिसल्याची अनेक उदाहरणं आहेत.
लोणावळा किंवा कर्जतची बाजू निवडताना तुम्ही अजिबात निराश होणार नाही. यामध्ये दरीच्या दोन्ही बाजूंनी घनदाट झाडांनी व्यापलेल्या जंगलातून ट्रेकिंग करणं हा एक अद्भुत अनुभव असतो. (Rajmachi Fort)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community