Ram Kund : श्रीरामांनी रामकुंडात केला होता दशरथांचा अंत्यविधी; नाशिकमधील रामकुंडाचं महत्त्व जाणून घ्या

44
Ram Kund : श्रीरामांनी रामकुंडात केला होता दशरथांचा अंत्यविधी; नाशिकमधील रामकुंडाचं महत्त्व जाणून घ्या

नाशिक शहराच्या मध्यभागी पवित्र गोदावरी नदी वाहते. तिथे एक आध्यात्मिक तीर्थस्थळ आहे. हे तिर्थस्थळ म्हणजे रामकुंड होय. रामकुंड हे पंचवटी परिसरात वसलेलं एक प्राचीन कुंड आहे. १६९६ साली चित्रराव खट्टरकर यांनी ते बांधलं. त्यानंतर चौथे पेशवे माधवराव यांच्या आई गोपिकाबाई यांनी या कुंडाचा जीर्णोद्धार केला. हे रामकुंड नाशिक इथल्या शाश्वत आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे. भगवान श्रीराम आपल्या वनवासाच्या काळात याच ठिकाणी स्नान करायचे. त्यांचं दिव्य चैतन्य या शांत परिसराला पवित्र करत असे. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये असंख्य भक्तगणांच्या उत्कट मंत्रांनी इथलं वातावरण दुमदुमतं. इथे येणारे सगळे भाविक भक्त भगवान श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या या कुंडाच्या जलामध्ये स्नान करण्यासाठी आतुरलेले असतात. रामकुंड इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला खरोखरच एक अलौकिक अनुभव मिळतो. (Ram Kund)

हिंदू धर्मामध्ये रामकुंडाला खूप महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे, असं मानलं जातं की, इथे आपल्या मृत प्रियजनांच्या अस्थींचे विसर्जन केल्याने त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. भगवान श्रीरामांनी स्वतः या ठिकाणी आपले पिता दशरथ यांचे अंतिम संस्कार केले होते. याच ठिकाणी भगवान श्रीरामांनी आपल्या पित्याच्या अस्थी गोदावरी नदीच्या पवित्र जलामध्ये विसर्जित केल्या होत्या. तेव्हापासूनच असंख्य भाविक भक्त आपल्या पूजनीय अवताराच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या प्रियजनाच्या अस्थी गोदावरी नदीच्या या शांत किनाऱ्यावर आणून विसर्जित करतात. (Ram Kund)

(हेही वाचा – summer dresses for women : उन्हाळ्यात महिला वापरु शकतात असे आरामदायी कपडे!)

रामकुंडच्या आसपास असलेली इतर स्थळं

रामकुंडला भेट दिल्यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक खजिन्याचा एक सुंदर अनुभव घेता येतो. याव्यतिरिक्त रामकुंडापासून थोड्याच अंतरावर असलेल्या काळाराम मंदिराची भव्यता आणि पवित्रताही पाहण्यासारखी आहे. काळाराम मंदिर हे उत्कृष्ट कोरीवकाम आणि वेगवेगळ्या शिल्पांनी सुशोभित केलेला वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तसंच इथून जवळच असलेली सीता गुंफा आहे. माता सीता आणि भगवान श्रीराम यांनी त्यांच्या वनवासाच्या काळात याच गुहेमध्ये आश्रय घेतला होता. (Ram Kund)

जर तुम्हाला निसर्गाच्या वैभवाचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव घ्यायचा असेल तर ब्रह्मगिरी पर्वतांच्या परिसराला नक्की भेट द्या. इथे हिरवेगार पर्वतउतार तुम्ही पाहू शकता. तसाच दगडांत कोरलेल्या प्राचीन गुहा आणि मठ तुम्हाला चिंतन करायला आणि आत्म-शोधाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन देतात. (Ram Kund)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.