कोकणचा राजा आता अ‍ॅमेझॉनवर!

148

उन्हाळा सुरू झाला की, सर्वांना आंब्याची चाहूल लागते. कोकणचा हापूस आंबा म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय! आता ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अग्रेसर असणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीने आंबा खरेदीला प्रारंभ केला आहे. कंपनीने मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. ही कंपनी रत्नागिरी हापूस आंबा विकणार असून थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरुवातही केली आहे.

( हेही वाचा : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ! नाहीतर… )

शेतकऱ्यांना थेट दर ठरवता येणार

सुरुवातीला १२ शेतकऱ्‍यांकडून कंपनीने ६०० डझन आंब्याची खरेदी केली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात आले. कोरोना लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला त्यामुळेच आता अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दलालांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना थेट दर ठरवता येणार असून ही एक नवी संधी असल्याचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी सांगितले.

हापूसला चांगला दर मिळवून देण्यासोबतच बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी खते, औषधे व इतर साहित्य अ‍ॅमेझॉनकडून उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप विकसित केले जाईल असे अ‍ॅमेझॉन प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.