-
ऋजुता लुकतुके
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान टिकवून आहे. गेल्यावर्षीपासून त्याने या जागेवर कब्जा केला आहे. क्रिकेट जगतात आदराने घेतलं जाणारं हे नाव आहे. अर्धशतक किंवा शतक ठोकल्यानंतर दांडपट्टा चालवावा अशी बॅट फिरवण्याची त्याची ॲक्शन जशी प्रसिद्ध आहे. तसंच मैदानातील त्याच्या कामगिरीमुळे त्याने भरवशाचं स्थान भारतीय संघात मिळवलं आहे. महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये त्याला ‘सर जडेजा’ ही उपाधी पहिल्यांदा दिली. त्यानंतर त्याचं तेच नाव क्रिकेटमध्ये रुढ झालं. किंवा भारतीय संघात त्याला ‘जड्डू’ असंही म्हणतात. (Ravindra Jadeja Net Worth)
(हेही वाचा- Aligarh मधील मशिद मंदिर असल्याचा पंडित केशव देव यांचा दावा)
बीसीसीआयने श्रेणीवार मोबदला प्रणाली राबवल्यापासून कायम रवींद्र जडेजा ए प्लस श्रेणीत आहे. त्यातून त्याची कामगिरी आणि भारतीय संघातील स्थान आपल्याला समजतं. अलीकडेच टी-२० मधून निवृत्त झालेल्या जाडेजाने १६ वर्षं भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. आणि या कालावधीत मैदानातील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेर पुरस्कार आणि जाहिरातींसाठी मोठाले चेकही कमावले आहेत. त्याची एकूण मिळकत आणि जीवनशैली बघूया, (Ravindra Jadeja Net Worth)
२०२४ मधील आकडेवारी बघितली तर रवींद्र जडेजाची कमाई १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर किंवा १२० कोटी रुपये इतकी आहे. भारतीय संघातील ए प्लस श्रेणीचा क्रिकेटपटू असल्यामुळे बीसीसीआयकडून त्याला वार्षिक २० कोटी रुपयांचा मोबदला मिळतो. त्याव्यतिरिक्त आयपीएल फ्रँचाईजी आणि विविध ब्रँडकडून त्याची कमाई होते. (Ravindra Jadeja Net Worth)
(हेही वाचा- National Commission for Scheduled Tribes ने महाराष्ट्र सरकारला खात्याचे नाव बदलण्याची सूचना का केली?)
मागच्या फक्त पाच वर्षांत जडेजाच्या संपत्तीत ७५० टक्क्यांची वाढ झाली आहे. गुजरातच्या सौराष्ट्रात जन्मलेला रवींद्र जडेजा कोहलीबरोबरच २००८ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. आणि तिथूनच कसोटी आणि एकदिवसीय संघात त्याची वर्णी लागली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल ३ त्रिशतकं ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. आणि तेव्हापासूनच निवड समितीचं त्याच्यावर लक्ष होतं. (Ravindra Jadeja Net Worth)
ए प्लस श्रेणीतील क्रिकेटपटू म्हणून बीसीसीआयकडून त्याला वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. शिवाय प्रत्येक कसोटीचे १५ लाख रुपये आणि एकदिवसीय सामन्याचे ६ लाख रुपये मिळतात. टी-२० मधून त्याने निवृत्ती पत्करली आहे. २००८ साली आयपीएल सुरू झालं तेव्हा विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाचा तो सदस्य होता. पण, तिथून धोणीने त्याला तीन वर्षांनी चेन्नई सुपरकिंग्जमध्ये बोलावलं. आणि तेव्हापासून तो तिथेच रमला आहे. यंदा चेन्नई फ्रँचाईजीने त्याला १८ कोटी रुपये मोजून आपल्याकडे कायम ठेवलं आहे. (Ravindra Jadeja Net Worth)
(हेही वाचा- Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणी ६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, कोट्यवधीच्या रक्कमेसह कागदपत्रे जप्त)
आयपीएलमध्ये स्थिरावल्यावर अहमदाबाद इथं त्याने मोठं घर बांधलं आहे. सध्या आपल्या पत्नीसह तो तिथेच राहतो. २००८ मध्ये ८ कोटी रुपयांना बांधलेलं हे घर सुसज्ज आणि अत्याधुनिक आहे. सुझुकी हायबुसा बाईक आणि पांढरी आऊडी कार या दोन त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. आणि त्याला घोडेसवारीचीही आवड आहे. त्यामुळे त्याने आपल्या इस्टेटमध्ये चक्क घोड्यांचा तबेलाही बांधला आहे. तिथे जडेजा घोडोसवारीचा आनंद लुटतो. आणि त्याच्या ताफ्यात विदेशातून आणलेले घोडेही आहेत. (Ravindra Jadeja Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community