तातडीने कुठल्याही वेळी रोख रक्कमेची गरज असल्यास, एटीएम सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. पण येत्या 1 ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. आरबीआयने लागू केलेल्या नवीम नियमांमुळे पैसे काढणं महाग होणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढताना, या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
काय आहेत नवे नियम?
सर्व बँकांच्या एटीएममधून डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणा-या आर्थिक व्यवहारांवर असलेली सध्याची इंटरचेंज फी ही 15 रुपयांवरुन 17 रुपये करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. तसेच नॉन फायनान्शियल ट्रॅन्जॅक्शनसाठी असलेली फी ही 5 रुपयांवरुन 6 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आरबीआयने तयार केलेले हे नवीन नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहेत.
जानेवारीपासून वाढणार हे चार्जेस
जून- 2019 मध्ये आरबीआयने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार, सध्या मेट्रो शहरांत महिन्याला एकूण तीन आणि इतर शहरांत पाच एटीएम ट्रॅन्जॅक्शन्स मोफत आहेत. त्यानंतरच्या व्यवहारांवर पैसे आकारले जातात. त्यापेक्षा जास्त व्यवहारांवर ग्राहकांना 20 रुपये चार्जेस आकारले जातात. त्यात आता एका रुपयाने वाढ करण्यात आली असून, हे चार्जेस 21 रुपये करण्यात आले आहेत. मात्र, हा नियम जानेवारी- 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.
फायनान्शियल ट्रॅन्जॅक्शन्स म्हणजे पैसे काढणे, किंवा पैशांचे व्यवहार करणे, तर नॉन फायनान्शियल ट्रॅन्जॅक्शन्स म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची इतर कामे करणे.
Join Our WhatsApp Community